जरे हत्याकांड; 16 सप्टेंबरला आरोप निश्चितीसाठी सुनावणी

जरे हत्याकांड; 16 सप्टेंबरला आरोप निश्चितीसाठी सुनावणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडातील 12 जणांविरूध्दची आरोप निश्चितीची प्रक्रिया 16 सप्टेंबरला होणार आहे. गणेशोत्सव बंदोबस्तामुळे या प्रकरणातील आरोपी बाळ बोठेसह अन्य आरोपींना मंगळवारी न्यायालयात आणता आले नसल्याने याबाबतची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपी आदित्य चोळके व सागर भिंगारदिवे यांच्या जामीन अर्जावर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद झाले असून, त्यावरील निकाल प्रतीक्षेत आहे. 30 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात रेखा जरे यांचा खून करण्यात आला आहे. पोलिसांनी या खून प्रकरणात 12 जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

या सर्वांविरूध्द आरोप निश्चितीची प्रक्रिया मंगळवारी (6 सप्टेंबर) होणार होती. मात्र, या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी आणले नसल्याने आता 16 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com