जरे हत्याकांड; बोठेला दिलासा नाहीच

जरे हत्याकांड; बोठेला दिलासा नाहीच
बाळ बोठे

अहमदनगर|Ahmedagar

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे याने जिल्हा न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केला आहे.

रेखा जरे यांच्या हत्याकांडात बोठे याचे नाव आल्याने तो पसार झाला होता. पोलिसांनी त्याला हैदराबाद येथून अटक केली. त्याच्यासह अन्य आरोपी विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

दरम्यान बोठे याने जिल्हा व सत्र न्यायालयात 14 जुलै रोजी जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. बोठेच्या जामीन अर्जावर आधी सरकार पक्षाने म्हणणे मांडले. यानंतर बोठेच्या वकिलांनी म्हणणे मांडले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. आज न्यायाधीश एम. व्ही. कुर्तडीकर यांनी बोठेचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे.

Related Stories

No stories found.