अहमदनगर (प्रतिनिधी) -

जरे हत्याकांडातील सूत्रधार बाळ बोठे याच्या पोलीस कोठडीची मुदत आज (शनिवार) संपत असल्याने त्याला पारनेर न्यायालयात

हजर करण्यात येणार आहे. पोलीस कोठडीदरम्यान बोठेने घटनेचा उलगडा केला असला तरी आणखी तपास करणे बाकी असल्याने वाढीव कोठडीची मागणी पोलीस करणार आहे. दरम्यान, पोलिसांनी शुक्रवारी बोठे याच्या समक्ष घराची झडती घेतली. त्याठिकाणी काही वस्तू हाती लागल्याचे सूत्रांनी सांगितले.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांचे हत्याकांडप्रकरणी बोठे याचे नाव आल्यानंतर तो 102 दिवसांपासून पसार होता. त्याला पोलिसांनी हैदराबाद येथील बिलालनगर परिसरातून मोठ्या शिताफीने अटक केली. अटक केल्यानंतर त्याला पारनेर न्यायालयात हजर केले होते. त्याला न्यायालयाने 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असून त्याला पारनेर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, बालिकाश्रम रोडवरील बोठे याच्या घराची झाडाझडती पोलिसांनी बोठेच्या उपस्थित घेतली. यामध्ये महत्त्वाच्या वस्तू ही पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते.

पंटर तनपुरेचे मोबाईल फॉरेन्सिककडे

आरोपी बोठे याला नगरमधून मदत करणारा पंटर महेश तनपुरे याच्याकडून पोलिसांनी सात मोबाईल जप्त केले आहे. त्या मोबाईलवरून तनपुरे बोठेशी संपर्क करत होता. संपर्क करताना त्याने व्हॉटसअॅपचा वापर केला आहे. व्हॉटसअॅपद्वारे फोन, मेसेज करून तनपुरे बोठेशी संपर्कात होता. तनपुरे बोठेच्या परिवाराशी बोठेचा संपर्क करून द्यायचा. जप्त करण्यात आलेल्या त्या मोबाईलमधील सर्व डाटा तनपुरेने डिलीट केला आहे. यामुळे तनपुरेचे मोबाईल फॉरेन्सिककडे पाठवले असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी सांगितले.