जामिनासाठी बोठेचा खंडपीठात अर्ज

रेखा जरे हत्याकांड: 2 डिसेंबरला सुनावणी
जामिनासाठी बोठेचा खंडपीठात अर्ज

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बहुचर्चित रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी बाळ बोठे याने जामिनासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. या जामीन अर्जावर येत्या 2 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

मागील वर्षी जातेगाव (ता. पारनेर) घाटात यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी बोठे याचा सहभाग आढळून आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली होती. अनेक दिवसांपासून बोठे अटकेत असून मध्यंतरी त्याने जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

मात्र, जिल्हा न्यायालयात जामीन न मिळाल्याने बोठेच्यावतीने वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेत जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर 2 डिसेंबर रोजी सुनावणी ठेवली आहे. न्यायमूर्ती एम. जी. सेवलीकर यांच्या खंडपिठासमोर ही सुनावणी होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com