जरे हत्याकांड; बोठेला नगर कारागृहात हलविण्याच्या हालचाली

'यांनी' केला न्यायालयात अर्ज
जरे हत्याकांड; बोठेला नगर कारागृहात हलविण्याच्या हालचाली
बाळ बोठे

अहमदनगर | Ahmedagar

रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे याच्यावतीने नगर कारागृहात हलविण्यासाठी पारनेर न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यावर अजून सुनावणी झाली नसून 7 मे रोजी सुनावणी होण्याचा अंदाज आहे.

न्यायालयाकडून पोलिसांना विचारणा होईल. से मागितला जाईल. त्यानंतर कार्यवाही होण्याची शक्यता असल्याचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी सांगितले. दरम्यान रूणाल जरे यांनी देखील बोठे असलेल्या बारकेत मोबाईल सापडला म्हणून बोठेला नगरच्या कारागृहात हलविण्यात यावे यासाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.

Title Name
Video : 'लॉकडाउन काळात शेतीमालाला शासनाने बाजारपेठ निर्माण करुन द्यावी'
बाळ बोठे

दरम्यान, तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक पाटील यांनी देखील बोठे याला नगर कारागृहामध्ये हलवणे योग्य ठरेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर जरे हत्याकांडातील पुरवणी दोषारोपपत्र जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल करू, अशीही माहिती उपअधीक्षक पाटील यांनी दिली.

पारनेर येथीन दुय्यम कारागृहातील दोन आरोपीकडे काही दिवसांपूर्वी मोबाईल आढळून आले आहेत. याच कारागृहात बाळ बोठे याला ठेवण्यात आले आहे. बोठे यानेही या मोबाईलचा वापर केल्याचा संशय असून, त्याला पारनेर येथून नगर येथील कारागृहात हलवावे, अशी मागणी मयत रेखा जरे यांचा मुलगा रूणाल जरे व अ‍ॅड. सचिन पटेकर यांनी केली आहे. बोठे याने या मोबाईलचा वापर केला असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांकडून याचा तपास सुरू करण्यात आला आहे. पारनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक घनश्याम बळप तपास करीत आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर बोठेला नगर कारागृहात हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com