<p><strong>अहमदनगर|Ahmedagar</strong></p><p>यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां रेखा जरे हत्या प्रकरणी बुधवारी दोघांना ताब्यात घेतले होते. </p>.<p>गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग असल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. सागर भिंगारदिवे (रा. केडगाव) व ऋषिकेश पवार (रा. प्रवरानगर ता. राहाता) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत, अशी माहिती तपासी अधिकारी अजित पाटील यांनी दिली. दोघांना दुपारी पारनेर न्यायालयात हजर करणार असल्याचे उपअधीक्षक पाटील यांनी सांगितले. या आधी तीन जणांना अटक करण्यात आली होती. हत्येचा मुख्य सूत्रधाराच्या मागावर पोलीस आहे. रेखा जरे यांची सोमवारी नगर- पुणे रोडवर जातेगाव (ता. पारनेर) फाट्याजवळ हत्या करण्यात आली होती.</p>