तिघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी

चार कोटींचे रक्तचंदन साठा प्रकरण
तिघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सुमारे चार कोटी रुपयांच्या रक्तचंदन साठा प्रकरणात अटक केलेल्या तिघांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी विठ्ठल बबन झावरे (वय 34 रा. वासुंदे, ता. पारनेर), संतोष साहेबराव माने (वय 35 रा. सावरगाव फाटा, ता. पारनेर) व सागर गोविंद मुळे (वय 38 रा. जांबुत ता. शिरूर, जि. पुणे) यांना अटक करून गुरूवारी न्यायालयासमोर हजर केले होते. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ करीत आहेत.

या गुन्ह्यात जागा मालक सदाशिव सिताराम झावरे (रा. वडगाव गुप्ता ता. नगर) याला यापूर्वीच अटक करण्यात आलेली आहे. तर लक्ष्मण गणपत शिर्के (कर्जुले हर्या ता. पारनेर) हा अद्यापही पसार आहे. एमआयडीसी परिसरात एका गोदामात साठवलेले साडेसात टन रक्तचंदन पोलिसांनी जप्त केले होते.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्ह्यातील पसार असलेल्या तिघांना तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हंडाळ यांच्या पथकाने बुधवारी मुंबई येथून ताब्यात घेत अटक केली आहे. पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, सहायक निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कामगिरी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com