पिपंरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

पोलीस पाटलांची भरती प्रक्रीया रखडल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून राहाता तालुक्यातील पंधरा गावांचा कारभार पोलीस पाटलांविनाच सुरू आहे.

येथील ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ, एकरुखे, गोगलगाव, दाढ बु., पिंपरी लोकाई, हसनापुर, लोहगाव, तिसगाव, पिंपळवाडी, रुई, नादुर्खी बु., केडवल, शिंगवे, राजंणगाव खुर्द, धनगरवाडी या पंधरा गावांचे पोलिस पाटील पदे रिक्त आहेत.

उपविभागीय अधिकारी शिर्डी यांनी आरक्षण सोडतीसाठी गावनिहाय लोकसंख्येची आकडेवारीही घोषीत केली आहे. प्रत्यक्ष आरक्षणाच्या सोडती करून निवड प्रकीया सुरू होणार तेच करोना विषाणुचा संकट काळ सुरू झाल्यामुळे आरक्षण सोडती व निवड प्रक्रीया स्थगीत झाली.

करोना संकट काळात शासनाने तयार केलेल्या ग्राम दक्षता कमेटीवर पोलीस पाटलांवर महत्वाची जबाबदारी होती,मात्र तालुक्यातील पंधरा गांवातील पदे रीक्त असल्याने पोलीस पाटलांअभावी या गावांना काही प्रमाणात समस्यांना सामोरे जावे लागले.