पोलीस पाटील पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू

पोलीस पाटील पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

2018 मध्ये सुरू झालेली व कोविड संकटामुळे (Covid 19 crisis) मध्यंतरी स्थगित झालेली राहाता (Rahata) तालुक्यातील 18 गावांतील पोलीस पाटील पदांच्या भरतीची प्रक्रिया (Recruitment process for Police Patil posts) सुरू झाली असून शिर्डी उपविभागीय अधिकार्‍यांनी (Shirdi Sub-Divisional Officer) आरक्षण सोडतीसाठी लोकसंख्येच्या प्रवर्गनिहाय लोकसंख्या निश्चितीसाठी ग्रामसभा घेण्याचे निर्देश दिले आहेत.

राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) गोगलगाव (Gogalgav), एकरुखे (Ekrukhe), दाढ बु. (Dadh Budruk), पिंपरी लोकाई, हसनापूर, लोहगाव, तिसगाव, पिंपळवाडी, रुई, नांदुर्खी बुद्रुक, केलवड बु., शिंगवे, पिंपरी निर्मळ, रांजणगाव खुर्द, धनगरवाडी, आडगाव बु., रामपुरवाडी, लोणी बु. या 18 गावांचे पोलीस पाटील (Police Patil) पदे रिक्त आहेत. 2018 मध्ये ही भरती प्रक्रीया (Recruitment Process) सुरू झाली होती. मात्र कोविड संकटामुळे मध्यंतरी स्थगित झाली होती. नाशिक विभागीय आयुक्तांच्या (Nashik Divisional Commissioner) सूचनेप्रमाणे रिक्त जागांची बिंदू नामावली मंजूर झालेली असून जिल्हाधिकार्‍यांनी ही पदे भरण्यासाठी मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आरक्षित जागांच्या सोडतीसाठी उपविभागीय अधिकारी शिर्डी (Shirdi) यांनी गावामधील लोकसंख्येची प्रवर्गनिहाय आकडेवारी निश्चित करण्यासाठी ग्रामसभा घेण्याचे निर्देश दिले आहेत.

यांनतर या गावांमधील सध्याच्या असलेल्या लोकसंख्येनुसार आरक्षणाच्या सोडती होऊन पोलीस पाटील भरतीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. तालुक्यातील 18 गावांना लवकरच नवीन पोलीस पाटील मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ग्रामीण भागात पोलीस पाटील पद प्रतिष्ठेचे मानले जाते तसेच पाटलांना शासनाकडून मानधनही देण्यात येते.त्यामुळे या पदासाठी अनेक इच्छुकांमध्ये रस्सीखेच दिसून येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com