ठाकरे सरकारकडून सूडबुद्धीने शेतकर्‍यांची वीजतोडणी
अरुण मुंढे

ठाकरे सरकारकडून सूडबुद्धीने शेतकर्‍यांची वीजतोडणी

वसुली कारवाईवर भाजपचे टीकास्त्र

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वीजबिल थकबाकी वसुलीसाठी (Recovery of Electricity Bill Arrears) आता महावसुली सरकारने राज्यातील गरीब व मध्यमंवर्गीयांच्या खिशावर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. गरीब वीज ग्राहकांच्या घरात अंधार पसरविण्याचे कारस्थान आखले आहे. बड्या वीजग्राहकांच्या आणि सरकारी कार्यालयांच्या कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीकडे दुर्लक्ष (Ignore) करून गरीब कुटुंबांची वीज कापणार्‍या ठाकरे सरकारने जनताविरोधी चेहरा पुन्हा उघड केला आहे, अशी टीका भाजपचे जिल्हा अध्यक्ष अरुण मुंढे (Criticism BJP district president Arun Mundhe) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

राज्यातील सरकारी कार्यालये, ग्रामपंचायती (Grampanchayat), पाणीपुरवठा योजना (Water supply scheme), मंत्र्यांचे बंगले, साखर कारखाने (Sugar Factories), खाजगी फार्म हाऊसमधील वीजबिलांच्या थकबाकीने उच्चांक गाठला असताना त्याकडे दुर्लक्ष करून दुष्काळ (Drought), अतिवृष्टी, करोनाकाळातील टाळेबंदीमुळे अगोदरच कंबरडे मोडलेल्या शेतकरी व गरीब कुटुंबांची ठाकरे सरकारने (Thackeray Government) फसवणूक केली आहे. धनिक थकबाकीदारांसाठी अभय योजना राबविणार्‍या आघाडी सरकारने गरीब शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले, असा आरोपही त्यांनी केला.

दुष्काळ, अतिवृष्टी, वादळांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी हवालदील झाला आहे, तर करोनाकाळातील टाळेबंदीमुळे सामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी मार्च महिन्यात विधिमंडळाच्या अधिवेशनात सरकारला जाब विचारल्यानंतर कृषीपंप आणि घरगुती ग्राहकांच्या वीज तोडणीची कारवाई थांबविण्याचे आश्वासन देण्यात आले. पण अधिवेशनानंतर पुन्हा वीजतोडणीची कारवाई सुरू करून सरकारने सामान्य जनतेचा विश्वासघात केला.

फडणवीस सरकारच्या काळात वीजग्राहकांच्या समस्या लक्षात घेऊन थकबाकी वसुली थांबविली व वीज मंडळास आर्थिक साह्य देखील केले. तरीही संपूर्ण कर्जमाफी मिळेपर्यंत वीजबिल भरू नका, असा सल्ला देत शरद पवारांसारखे नेते त्या काळात जनतेस भडकावत होते. आता त्यांच्याच आशीर्वादाने ठाकरे सरकारने वसुलीसाठी कारवाई करून लाखो कुटुंबांना वेठीस धरले आहे, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष मुंढे (Criticism BJP district president Arun Mundhe) यांनी केली.

एकीकडे शेतकर्‍यांच्या प्रश्नावरील आंदोलनांना पाठिंबा द्यायचा व दुसरीकडे राज्यातील शेतकर्‍यांची वीज तोडायची हा महावसुली सरकारचा दुटप्पीपणा जनतेने आता ओळखला असून तो त्वरित थांबविला नाही तर जनतेच्या रोषास सामोरे जाण्याची तयारी ठेवा असा इशाराही (Hint) मुंढे यांनी दिला.

Related Stories

No stories found.