सात बारा, रेकॉर्डवरील ताबा दुरूस्तीसाठी ‘सलोखा’ योजना
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
शेतकर्यांच्या शेतजमीनीचा ताबा एकमेकांच्या नावावर असल्यास तो दुरुस्त करुन घेण्यासाठी सरकारने ‘सलोखा’ योजना सुरु केली आहे. त्यासाठी केवळ एक हजाराच्या मुद्रांक शुल्कात रेकाँर्डची दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती पाथर्डी-शेवगाचे प्रांतअधिकारी बालाजी क्षिरसागर यांनी दिली.
राज्य सरकारने 3 जानेवारी 2023 रोजी नवीन आदेश काढुन सलोखा योजना सुरू केली आहे. शेतकर्यांच्या आपसातील जमीनीवरुन असलेले वाद, जमीनीचे रेकाँर्ड दुरुस्ती, रस्त्याचा वाद, भावाभावातील शेतजमीन वाटणीवरुन वाद, शेतजमीन एकमेकांच्या नावाववर असल्याने वाद यामुळे समाजात अनेक वाद उभे राहुन अडचणी वाढत चालल्या आहेत. यापुर्वी असे कोणतेही रेकॉर्ड बदल करणे सहज शक्य नाही. तसेच यासाठी जमीनीच्या किंंमतीच्या तुलनेत मुद्रांक शुल्क भरावे लागत होते.
यामुळे अनेक वर्षांपासून अशा दुरूस्त्या तसेच यामुळे सुरू असणरे वाद चालूच आहेत. त्यासाठी शासनाने सर्वसामान्यांना सहज हे बदल करणे शक्य व्हावे यासाठी सलोखा योजना सुरु केली आहे. मुद्रांक शुल्कामधे मोठी सुट देण्यात आली आहे. केवळ 1 हजार रूपये मुद्रांक शुल्कात हे बदल करण्यात येणार आहेत.
जुन्या वाद असणार्या शेतकर्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. कामगार तलाठी योजनेचा तपशील शेतकर्यांना समजावुन सांगतील. नियमामधे भसणार्या शेतकर्यांना योजनेत केवळ एक हजार रुपये शुल्क भरुन जमीनीची अदलाबदल करता येईल. त्यासाठी अटी व शर्ती शेतकर्यांनी तलाठी यांच्याकडुन समावुन घ्याव्यात व अर्ज तलाठी यांच्याकडेच रावेत असे आवाहन पाथर्डी- शेवगाचे प्रांतअधिकारी बालाजी क्षिरसागर यांनी केले आहे.
प्रत्येक शेत जमीनत भावांमध्ये, भावकी, नातेवाईक यांच्यामध्ये काहीना काही वाद सुरू आहेत. यामध्ये सर्वाधिक वाद हे वाटण्या, अगर वाटण्या होनही हिस्से ऐकमेकांच्या नावावर असण्यावरून आहेत. यासह अनेक दुरूस्त्या न होऊ शकल्याने हे वाद वाढत आहेत. शेतकर्यांनी सलोखा योजनेचा लाभ घेवून हे वाद कायमस्वरूपी मिटवावेत व नात्यांमध्ये सलोखा निर्माण करावा.
- बालाजी क्षिरसागर, प्रांताधिकारी