अकोले तालुक्यात आजपर्यंतच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद
सार्वमत

अकोले तालुक्यात आजपर्यंतच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद

तालुक्यातील एकून रुग्णसंख्या झाली २७८

Nilesh Jadhav

अकोले | प्रतिनिधी | Akole

अकोले Akole तालुक्यात आज सर्वाधिक तब्बल १९ करोना बाधित आढळून आले. त्यात Rapid Antigen Test मध्ये १५ व खासगी प्रयोगशाळेतील एक असे ०४ व्यक्ती यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे अकोले तालुक्यातील रुग्ण संख्या २७८ वर पोहचली आहे. आज स्वातंत्र्य दिनी आढळुन आलेली १९ ही रुग्णसंख्या आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. शहरातील कारखाना रोडसह तालुक्यातील परखतपुर, धामणगाव आवारी, मनोहरपुर, कळस, हिवरगाव आंबरे, देवठाण,कोतुळ, ब्राम्हणवाडा येथील व्यक्ती आज करोना बाधित आढळून आल्या आहेत.

खानापुर येथील Covid Care Center मध्ये १३० व्यक्तीच्या Rapid Antigen Test घेण्यात आल्या. यामध्ये १५ व्यक्ती करोना पॅाझिटीव्ह Corona Positive आले आहेत. यामध्ये शहरातील कारखाना रोड येथील ४२ वर्षिय पुरुष, ७१ वर्षिय पुरुष, १६ वर्षिय तरुण, १२ वर्षिय युवती, मनोहरपुर येथील ४० वर्षिय पुरुष, १३ वर्षिय तरुण, ३४ वर्षिय महीला, हिवरगाव आंबरे येथील ५१ वर्षिय पुरुष, ४६ वर्षिय महिला, ८ वर्षिय मुलगा, कळस येथील ३० वर्षिय तरुण, देवठाण येथील ८५ वर्षिय वृद्ध व कोतुळ येथील ४१ वर्षिय पुरूष, २३ वर्षिय पुरूष, ९५ वर्षिय महीला अश्या १५ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला तर खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात धामणगाव आवारी येथील ४४ वर्षिय पुरूष, परखतपुर येथील ३९ वर्षिय पुरूष, ब्राम्हणवाडा येथील ३५ वर्षिय पुरुष व कोतुळ येथील ४० वर्षिय पुरुष अशी चार व्यक्तीचा करोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. अकोले Akole तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या रुग्णसंख्ये बद्दल चिंता व्यक्त केली जात असताना अकोले शहरात मात्र शहरासह तालुक्यातील नागरीकांची वर्दळ मात्र कमी व्हायचे नाव घेत नाही. महत्वाच्या कामा व्यतिरिक्त कुणीही घराबाहेर पडू नये, घरीच रहा, सुरक्षित रहा असे आवाहन प्रशासनाच्या व विविध सामाजिक संघटना यांचे वतीने करण्यात येत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com