मशिदीच्या स्पिकरवरून केले लसीकरणासाठी आवाहन आणि मग झाले 'असे' काही....

मशिदीच्या स्पिकरवरून केले लसीकरणासाठी आवाहन आणि मग झाले 'असे' काही....

शिर्डी | शहर प्रतिनिधी

करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम (Corona Vaccination) आणखी गतिमान व्हावी म्हणून शिर्डी नगरपंचायत (Shirdi Nagarpanchayat) व राहाता ग्रामीण रुग्णालय (Rahata Rural Hospital) यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात लसीकरण सप्ताह (Corona Vaccination Week) रबिवण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून शहरातल्या मुस्लीमबहुल भागातील शिर्डी उर्दू हायस्कूलमध्ये (Shirdi Urdu High School) काल लसिकरण होते.

सुरवातीला लसीकरणाला (Covid19 Vaccination) मिळालेला अत्यल्प प्रतिसाद पाहून स्थानिक मुस्लिम नेत्यांनी (Muslim leaders) पुढाकार घेत मशिदीच्या स्पीकरवरून (Mosque Speakers) समस्त नागरिकांना लसीकरण करण्याचे आवाहन केल्याने सर्व मुस्लिम बांधवांनी तातडीने उस्फुर्त प्रतिसाद देत तब्बल १ हजार ३०० जणांनी रेकॉर्ड ब्रेक लसीकरण (Record break vaccination) करुन घेतल्याबद्दल या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत शिर्डी शहर काँग्रेसच्या (Congress) वतीने कार्याध्यक्ष समिर शेख यांनी आभार मानले.

दरम्यान करोना महामारीचा (COVID19 crisis) प्रकोप सर्व जगाने अनुभवला. त्याला पायबंद घालण्यासाठी जगभरात करोना प्रतिबंधक लस नागरिकांना दिली जात आहे. भारतातही मोठ्या संख्येने नागरिक उत्स्फूर्तपणे लसीकरण करून घेत आहे. शिर्डी नगरपंचायत व राहाता ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१ आँक्टोंबर ते ६ आँक्टोंबर पर्यंत शिर्डी शहरातील नागरीकांसाठी लसिकरण सप्ताह मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत लसिकरणाचे डोस न घेतलेल्या रहिवाशांना नगरपंचायत तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासह शिर्डी शहर काँग्रेसच्या पदाधिकारी पुढाकार घेऊन शहरातील नागरीकांना लसिकरण करून घ्यावे असे आवाहन केले. या आवाहानास शिर्डी शहरातील नागरीकांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला.

दरम्यान काल मुस्लिम समाजातील बांधवांनी उर्दू हायस्कूलमध्ये रेकॉर्ड ब्रेक गर्दी करून लसिकरण करुन घेतले. एरवी मशिदीच्या भोंग्यांतून अजान ऐकणाऱ्या लोकांनी आज त्याद्वारे पहिल्यांदाच एक सामाजिक आवाहन ऐकले. त्या आवाहनास प्रतिसाद देत नागरिकांनी लसिकरणासाठी एकच गर्दी केली. लसीकरणला भरघोस प्रतिसाद मिळाला. या उपक्रमामुळे या भागातल्या नागरिकांचे रेकॉर्ड ब्रेक लसीकरण झाले. त्यामुळे अनेकांनी समाधानही व्यक्त केले. या कामी काँग्रेसचे शिर्डी शहर कार्याध्यक्ष समीर शेख व त्यांचे सर्व सहकारी तसेच मुस्लिम समाजातील सर्वच नेते व कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केला. तसेच नागरिकांना तांत्रिक सहाय्य केले. मुस्लिम समाजाने व जामा मस्जिद ट्रस्टने उचललेल्या या प्रागैतिक पाऊलामुळे समाजाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Stories

No stories found.