कुरिअर मिळाना म्हणून कस्टमर केअरला केला फोन, झाले असे..

कुरिअर मिळाना म्हणून कस्टमर केअरला केला फोन, झाले असे..

अहमदनगर|Ahmedagar

कुरिअर मिळाले नाही म्हणून गुगल अ‍ॅपवरून घेतलेल्या एक्सप्रेस कुरिअरच्या कस्टमर नंबरवर फोन केल्यानंतर बँक खात्यातून 79 हजार 844 रूपये काढून घेतल्याचा प्रकार नगरमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या फातीमा बोहरी (रा. नगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी यांनी त्यांची राजकोट येथे राहणार्‍या मैत्रिणीकडे कपड्याची मागणी केली. त्या मैत्रिणीने फिर्यादी यांच्या पत्त्यावर एक्सप्रेस कुरिअरने कपडे पाठविले. कुरिअर मिळाले नाही म्हणून फिर्यादी यांनी गुगल अ‍ॅपवर कुठे एक्सप्रेस कुरिअरचा कस्टमर नंबर मिळतो का याचा शोध घेतला. एक नंबर त्यांना मिळाला. त्यांनी त्या नंबरवर फोन केेला असता लॉकडाऊनमुळे कुरिअर मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे.

यासाठी समोरील व्यक्तीने दिलेल्या नंबरवर एक रूपया फोन पे करण्यास सांगितले. यानंतर फिर्यादी यांच्या खात्यातील पाच हजार रूपये काढून घेतल्याचा मेसेज त्यांना आला. त्यांनी त्या नंबरवर फोन केला असता तुम्हाला पैसे परत करतो. त्यासाठी तुमच्या मोबाईलवर एक लिंक दिली आहे, त्यावर ओपन करा असे सांगण्यात आले. लिंक ओपन केल्यानंतर सुरूवातीला 24 हजार 987 त्यानंतर 49 हजार 857 रूपये ट्रान्सपर झाल्याचा मेसेज फिर्यादी यांना आला.

आपली फसवणूक झाली असल्याची तक्रार त्यांनी नगर सायबर पोलीस ठाण्यात दिली. त्या तक्रारीची दखल घेतली नसल्याने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असल्याचे बोहरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक रवींद्र पिंगळे करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com