सीना पूरनियंत्रण रेषेचे फेरसर्वेक्षण

जलसंपदा मंत्र्याचे आदेश । आ. जगतापांची माहिती
सीना पूरनियंत्रण रेषेचे फेरसर्वेक्षण

अहमदनगर (प्रतिनिधी)

सीना नदीचा उगम नगर शहराजवळून असल्यामुळे एकदाही सीना नदीचा पूर शहरांमध्ये पसरला नाही. पावसाळ्यामध्ये अनेकदा पूरपरिस्थिती निर्माण झाली. परंतु हे पाणी शहराच्या कोणत्याही भागात घुसले नाही. या सर्व बाबी शासनासमोर निदर्शनास आणल्यामुळे सीनानदी पूर नियंत्रण फेरसर्वेक्षण आदेश जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे, अशी माहिती शहराचे आ. संग्राम जगताप यांनी दिली.

नगर शहरातून वाहत असलेली सीनानदीचे कार्यक्षेत्र सुमारे १४ किलोमीटर असून शहराच्या मध्यवर्ती भागातून ही नदी वाहते. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार सीना नदीच्या पूर रेषेची हद्द सुमारे ५०० मीटरच्या दरम्यान असल्यामुळे नदीलगत राहणाऱ्या नागरिकांना कुठल्याही प्रकारची बांधकामाची परवानगी मिळत नाही. या नियमामुळे शहरातील ५० टक्के नागरिकांना पूर नियंत्रण रेषेच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी २५ मे रोजी जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आ. जगताप यांच्या मागणीनुसार सीना नदीच्या पूर नियंत्रण रेषेबाबत फेर सर्वेक्षणाचे आदेश दिले. याचबरोबर सीना नदी खोलीकरण व रुंदीकरणासाठी लागणाऱ्या निधीसाठी तातडीने अंदाजपत्र तयार करण्याचे आदेश दिले. लवकरात लवकर हे अंदाजपत्रक सादर करावे यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. यावेळी आ. संग्राम जगताप तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. काही महिन्यांपूर्वी जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे नगर दौऱ्यावर आले असता त्यांना प्रत्यक्षात सीनानदी पूर नियंत्रण रेषेची पाहणी केली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com