रायतळ्यात चोरट्यांचा किराणा दुकानावर डल्ला

रायतळ्यात चोरट्यांचा किराणा दुकानावर डल्ला

सुपा |वार्ताहर| Supa

पारनेर (Parner) तालुक्यातील रायतळे (Raytale) येथे चोरट्यांनी किराणा दुकानावर निशाना साधत रोख रक्कमेसह, साखरेचे कट्टे, तेलाचा डबा, बिस्कीट पाकीटे मेकप साहित्य चोरून नेले. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात (Supa Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत स्वाती सचिन येणारे (रा. तुकाई वस्ती रायतळे ता.पारनेर) यांनी सुपा पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, रविवारी (दि.27) रात्री 8.30 ते सोमवार (दि.28) या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी (unknown thieves) आमच्या किराणा दुकानच्या (Grocery store) शटरच्या कड्या तोडून आत प्रवेश करून पाच हजारापेक्षा जास्त किमतीचे साखरेचे तीन कट्टे, एक 15 किलोचा खाद्य तेलाचा डबा, एक हजार रुपये किमंतीची बिस्किटे व दहा हजार रुपये किमतीचे मेकपचे सामान, तसेच गल्लातील रोख पाच हजार रुपये असे मिळून ऐकून 23 हजार 420 रुपयाच्या मुद्देमाल चोरून नेला. सुपा पोलिसांनी येणारे यांच्या फिर्यादीवरुन चोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरिक्षक नितिनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आर.जे.पटेल हे पुढील तपास करत आहेत. त्यांना सहायक फौजदार आ. जे. साबळे सहाय करत आहेत.

करोना काळात अनेकांच्या नोकर्‍या, व्यवसाय बुडाले. त्यामुळे काही लोक वैफल्यग्रस्त झाले असून पैशाची चूणचूण भासू लागल्यामुळे तरुण वाम मार्गाकडे वळू लागले आहेत. तर कौटुंबिक समस्याने ग्रासल्याने चोरानी किराणा दुकानावर हात साफ केला असल्याची चर्चा गावात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com