पठारभागातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणार - रविंद्र बिरोले

पठारभागातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणार - रविंद्र बिरोले

आश्वी |वार्ताहर| Ashwi

30 के एल पीडी क्षमतेचा डिस्टीलरी व इथेनॉल प्रकल्प उभारणीचा निर्णय घेणार्‍या राज्यातील मोजक्या साखर कारखान्यापैकी श्री गजानन महाराज शूगर लि असून बहुतांश साखर कारखान्यांनी भूमीपूजन करुन प्रकल्पास विलंब करताना दिसत आहे मात्र माझ्या सभासद, आधिकारी, कर्मचार्‍यांच्या कार्यक्षमतेमुळेच हा प्रकल्प 7 महिन्यातच उभा राहून पठार भागासह परिसरातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन श्री गजानन महाराज शुगर लि. चे संस्थापक चेअरमन रविंद्र बिरोले यांनी दिले.

संगमनेर तालुक्यातील कौठे-मलकापूर येथील श्री गजानन महाराज शूगर लि. च्या 30 के एल पी डी क्षमतेचा डिस्टीलरी व इथेनॉल प्रकल्पाच्या भूमीपूजन प्रसंगी बिरोले बोलत होते. यावेळी रविंद्र बिरोले व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली.

यावेळी रविंद्र बिरोले पुढे म्हणाले की, 8 वर्षापुर्वी या माळरानावर निसर्ग हरवलेला दिसला मात्र श्री गजानन महाराज यांच्या आशिर्वादाने साखर कारखाना उभा राहील्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या. हाताला रोजगार मिळाला हळुहळु निसर्ग फुलू लागला असून या परिसरात विकासाची घौडदौड मोठ्या प्रमाणात करायची असून डिस्टीलरी व इथेनॉल प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होवून विकासाला चालना मिळाणार असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.

यावेळी श्री गजानन महाराज शुगरचे संचालक सौ. आश्विनीताई बिरोले, शंतनू बिरोले, नंदन बिरोले, सौ. ईशा बिरोले, अ‍ॅड. रामदास शेजूळ, सुभाषराव कोळसे, हरिभाऊ गीते, केरुबापू मगर, बाळासाहेब खेमनर, जनरल मॅनेजर बबनराव पवार, वर्क्स मॅनेजर अनिल वाकचौरे, सचिन देशमाने, अजित गुळवे, नितेश रणवारे, श्रीकांत इंगळे, बाळासाहेब डेरले, विजय खरात, गोरक्षनाथ डहाळे, देवीदास लाड, राहुल कमादार, विजयकुमार जाधव, बाबाजी सागर, गुलाबराव भोसले, योगेश खेमनर, पप्पू खेमनर, कैलास डोंगरे, लक्ष्मण गीते, संरपच राहुल गंभीरे, लालू शेख, संदिप पंचपिंड, सुभाष खेमनर, शिवाजी भोसले, सुनिल गीते, संतोष खेमनर, योगेश डोंगरे, भाऊसाहेब बागुल, प्रकाश काकडे, भास्कर शिंदे, पांडूरंग काकडे, विठ्ठल तमनर, हरि काळे, शेषराव पाटील, जीवन आहेरे, समाधान पाटील, राजेश गायकवाड, एस पी स्पेनट्रम्चे मालक तथा टेक्नीकल मार्गदर्शक वसंत गोंदकर, ओमराज सन् व्यवस्थापक प्रकाश सोनवणे आदिसह सभासद, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com