स्वस्त धान्यातील साठ्यात तफावत; दुकानदारांवर गुन्हे दाखल
सार्वमत

स्वस्त धान्यातील साठ्यात तफावत; दुकानदारांवर गुन्हे दाखल

Arvind Arkhade

पारनेर|तालुका प्रतिनिधी|Parner

पारनेर शहरात असणार्‍या दोन्ही विविध कार्यकारी सेवा संस्थेत कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार घडला. रेशनचा माल परस्पर विकल्याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष व स्वस्त धान्य दुकानदारांवर पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारनेर शहरातील पारनेर (पश्चिम भाग) व पारनेर (म.प) पूर्वभाग विविध कार्यकारी सेवा संस्था यांच्या अखत्यारीत असलेल्या स्वस्त धान्य दुकानांना मंजूर करण्यात आलेला दि. 28 रोजी पर्यंतचा साठा तपासला असता त्यामध्ये तफावत आढळून आली.

स्वस्त धान्य दुकानांचे परवानाधारक आरोपी पारनेर पश्चिम भागचे अध्यक्ष, दुकान चालक नारायण नामदेव म्हस्के रा.पारनेर व पारनेर (म.प) पूर्वभागचे दुकान चालक शकूर यासीन शेख रा.पारनेर यांनी स्वतःच्या फायद्याकरिता दुकानांना मंजूर केलेला धान्यसाठा गरजू लाभार्थ्यांना न देता तो स्वतःच्या फायद्याकरिता अन्यत्र विक्री करून, अपहार करून शासन व लाभार्थ्यांची फसवणूक केली आहे.

यासंदर्भातची फिर्याद विवेक विनोद वैराळकर (वय 38, धंदा- नोकरी, रा. पारनेर) यांनी दिली. त्यानुसार पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी करत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com