100 रुपयात रवा, डाळ, साखर, तेल शिधा रेशन दुकानात पोहोचलाच नाही !

रेशन दुकान
रेशन दुकान

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

रेशन दुकानात 100 रुपयात एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि तेल देण्याची सरकारची योजना आहे. पण दिवाळी तोंडावर आलेली असताना हा माल रेशनवर आलेला नसल्याने कार्ड धारकांची कुचबणा होत आहे. तर रेशनदुकानदारांना कार्ड धारकांची समजूत काढण्यात नाकेनऊ येत आहे.

गोरगरीब कुटुंबांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने केवळ शंभर रुपयांमध्ये एक लिटर पामतेल आणि प्रत्येकी एक-एक किलो साखर, रवा, चणाडाळ या चार वस्तूंचे किट देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, दिवाळी आठवड्यावर आली तरी अद्याप रेशन दुकानातून या किटचे वाटप सुरू झालेले नाही. याबाबत विरिष्ठांशी संपर्क साधला असता उडवाउडवीचे उत्तरे दिली जात आहेत.

अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील एपीएल (केसरी) रेशनकार्डधारकांना नियमित अन्नधान्यांव्यतिरिक्त हा शिधा शंभर रुपयांमध्ये मिळणार आहे. पण तो अद्यापही उपलब्ध न झाल्याने त्वरीत उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com