स्वस्तधान्य दुकानासाठी अर्ज पाठवावेत, तहसीलदारांचे आवाहन

स्वस्तधान्य दुकानासाठी अर्ज पाठवावेत, तहसीलदारांचे आवाहन
File Photo

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील नवीन रास्तभाव दुकाने देणे कामी जाहिरनामा प्रसिध्द करण्यात आला असून त्यासाठी दिनांक 13 सप्टेबर 2021 पर्यंत तहसिल कार्यालय, श्रीरामपूर येथे अर्ज दाखल करावेत, असे आवाहन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी याच्याकडील जाहिरनामा पत्राच्या अनुषंगाने भविष्यात द्यावयाची रास्तभाव दुकाने पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था), नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था, संस्था नोंदणी अधिनियमाअंतर्गत नोंदणी झालेल्या सार्वनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास, यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

तरी इच्छुक पंचायत, संस्था, स्वयंसहाय्यता गटांनी आवश्यक त्या कागदपत्रासह तहसिलदार श्रीरामपूर यांचेकडे मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com