टिळकनगर |वार्ताहर| Tilaknagar

राज्यातील अनेक गोरगरिब आजही रेशन दुकानावरील गहू आणि तांदूळावर आपल्या कुंटुबाचे पोट भरतात.

त्यात करोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊननंतर तर अनेकांचे संसार उद्धवस्त झाल्याने रेशन दुकानाचा गहू आणि तांदूळाचा अनेक गोरगरिबांना पोटाची खळगी भरण्यासाठी मोठा आधार मिळाला.

मात्र शासनाने राज्यातील गरिबांची थट्टा मांडल्याचे चित्र आहे. कारण जिल्ह्यासह राज्यातील रेशन दुकानावर आता गव्हाऐवजी मका दिली जात असल्याने शासन आता गव्हाऐवजी मका भरडून खाण्याचा अप्रत्यक्ष सल्ला देत गरिबांची थट्टा उडवित असल्याचे चित्र आहे.

रेशनकार्डधारकांना शासनाकडून अल्पदरामध्ये रेशन दुकानांच्या माध्यमातून गहू आणि तांदूळ दिला जातो. त्यामुळे अनेक गरिबांच्या कुंटुबांचे पोट या गव्हासह तांदूळावर भरते. परंतु, शासनाने यंदा नाफेडच्या खरेदी केंद्राच्या माध्यमातून तूर, उदीड, मुग आणि मका खरेदी केली आहे. त्यामुळे शासनाने खरेदी केलेल्या मकाचे काय करायचे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने खरेदी केलेली ही मका आता रेशनकार्डधारक गरीबांच्या मुळावर उठली आहे.

कारण प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजना व अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत शासनाकडून रेशन दुकानांच्या माध्यमातून रेशनकार्डधारकांना सप्टेंबर महिन्यांमध्ये गव्हाऐवजी मका दिली जात आहे.

शासनाकडून प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजना व अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत रेशनकार्डधारकांना प्रति लाभार्थी तीन किलो गव्हू दिले जातो. मात्र, आता प्रति लाभार्थी 1 किलो गहू दोन किलो दिली जात आहे. परिणामी गोरगरिब रेशनकार्डधारकांना मका खाऊ घालण्याचा घाट शासनाने मांडले आहे, यात शंका नाही.

गव्हाच्या चपात्या, मकाचं काय ?

रेशन दुकानांद्वारे शासनाकडून मिळणार्या गव्हाच्या चपात्या करून पोटाची खळगी भरली जात होती. मात्र, शासनाने रेशनकार्डधारकांच्या तोंडाचा गव्हाचा घास हिरावून रेशन दुकानांमार्फत मका हवाली केली जात आहे. त्यामुळे आता मकाच भरडून खावी का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.