रतनवाडीत 131 मिमी पाऊस

भंडारदरात नव्याने 21 दलघफू पाणी दाखल
रतनवाडीत 131 मिमी पाऊस
File Photo

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा पाणलोटातील चेरापुंजी समजल्या जाणार्‍या रतनवाडीत तब्बल 131 मिमी पावसाची नोंद झाली. घाटघर आणि पांजरेतही पाऊस झाल्याने काल सकाळी संपलेल्या 24 तासांत धरणात नव्याने 21 दलघफू पाणी दाखल झाले. भंडारदरातील पाणीसाठा 2467 दलघफू आहे.

पाणलोटात मान्सून रविवारी दाखल झाला. परिसरात या दिवशी सायंकाळी पाच वाजेपासून अधूनमधून सरी कोसळत आहेत. भंडारदरा 13, घाटघर 40, पांजरे 29, रतनवाडी 131 तर वाकी 9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे डोंगर दर्‍यांमधील छोटे ओढे-नाले सक्रिय झाले असून धरणाच्या पाण्यात विसावू लागले आहेत.

काल सोमवारीही पाणलोटात पावसाळी वातावरण टिकून होते. काल दिवसभरात भंडारदरात 9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. अधूनमधून रिपरिप सुरू आहे. पाणलोटातही अधूनमधून सरी कोसळत आहेत. पाऊस पडता झाल्याने या भागातील शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे.

112 दलघफू क्षमतेच्या वाकी तलावात यंदा साठा चांगला असून पावसाचे प्रमाण वाढल्यास दोन तीन दिवसांत हा तलाव निम्मा भरलेला असेल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com