रतनगडावर आता 'एवढ्याच' पर्यटकांना परवानगी

वनविभागाचे आदेश
रतनगडावर आता 'एवढ्याच' पर्यटकांना परवानगी

अकोले |प्रतिनिधी| Akole

पर्यटकांचे (Tourists) आकर्षण असलेल्या अकोले (Akole) तालुक्यातील रतनगडावर (Ratangad) यापुढे शनिवार-रविवारच्या सुट्यांच्या दिवशी फक्त 300 पर्यटकांनाच जाण्यासाठी परवानगी वन विभागाने (Forest Department) दिली आहे.

रतनगडावर आता 'एवढ्याच' पर्यटकांना परवानगी
साखरेला द्विस्तरीय भाव मिळाल्यास शेतकर्‍यांचा ऊसाला प्रतिटन 4950 रुपये भाव देणे शक्य

वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) भंडारदरा (Bhandardara) या विभागाने शनिवार-रविवार आठवड्याची सुट्टी असल्याने रतनगडावर (Ratangad) मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच रतनगड (Ratangad) हे ठिकाण स्थानिक वनकर्मचारी, संरक्षण मजूर यांच्याकडून पर्यटक यांना वारंवार सूचना देऊन ही गडावरील आलेल्या पर्यटकांकडून नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे.

रतनगडावर आता 'एवढ्याच' पर्यटकांना परवानगी
462 अवघड क्षेत्रांतील शाळांची यादी प्रकाशित

शनिवार-रविवार विकेंड सुट्टीला फक्त 300 पर्यटकांना रतनगडावर (Ratangad) जाता येईल. याबाबत शेंडी व भंडारदरा पर्यटक चेक पोस्ट (Bhandardara Tourist Check Post) वर संबंधीत पर्यटक यांच्या पर्यटन शुल्क पावतीवर रतनगड (Ratangad) परवाना संदर्भात शेरा देऊन त्यांना रतनगडावर (Ratangad) पर्यटनासाठी जाणेबाबत परवानगी देण्यात यावी. तसेच रतनगडावर (Ratangad) पावती तपासणी संदर्भात स्थानिक वनकर्मचारी व संरक्षण मजूर यांना सूचना देण्यात यावी.

रतनगडावर आता 'एवढ्याच' पर्यटकांना परवानगी
अकोले येथे किसान सभेचे राज्य अधिवेशन सुरू

तसेच जे पर्यटक विना परवाना अथवा सूचना देवूनही रतनगडावर (Ratangad) नियमांचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये गुन्हा नोंद केला जाईल तसेच या बाबतीत स्थानिक लोकांमध्ये ही संरक्षणाच्या दृष्टीकोणातून पर्यटन जनजागृती करावी व रतनगडावर संरक्षण मजूरांची संख्या मध्ये वाढ करावी, असे सहा. वनसंरक्षक (वन्यजीव) कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य गणेश रणदिवे व वन परीक्षेत्र अधिकारी अमोल आडे यांनी सांगितले.

रतनगडावर आता 'एवढ्याच' पर्यटकांना परवानगी
संगमनेर शहरात भुरट्या चोर्‍यांमध्ये वाढ
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com