VIDEO : किसान सभा-काँग्रेसचा भेंड्यात रास्तारोको

VIDEO : किसान सभा-काँग्रेसचा भेंड्यात रास्तारोको

केंद्र सरकारने शेतकरी-कामगार कायदे मागे घेण्याची मागणी

नेवासा | तालुका प्रतिनिधी

अखिल भारतीय किसान सभा (Aakhil Bhartiy Kisan Sabha) व तालुका काँगेसच्या (Newasa Congress) वतीने तालुक्यातील भेंडा (Bhenda) येथे नेवासा-शेवगाव रस्त्यावर (Newasa-Shevgoan Road) रास्तारोको आंदोलन (RastaRoko) करण्यात आले. केंद्र सरकारने (Modi Govt) शेतकरी विरोधी तीन कायद्यासह (Farms Law) कामगार कायदा (labor laws) रद्द करावी अशी मागणी किसान सभेचे जेष्ठ नेते कॉ.बाबा आरगडे यांनी केली.

किसान सभेचे जेष्ठ नेते कॉ.बाबा आरगडे व काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजी माळवदे यांचे नेतृत्वाखाली सोमवार दि.27 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता भेंडा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. रास्तारोको पूर्वी बसस्थानका समोरील प्रांगणात आंदोलकांची भाषणे झाली. त्यानंतर नेवासा-शेवगाव रस्त्यावर येऊन आंदोलकांनी रस्ता अडवला. कॉ.बाबा आरगडे यांचे भाषणानंतर प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले. त्यामुळे सकाळी केवळ 11:30 ते 11:40 या वेळेत रास्तारोको झाला.

VIDEO : किसान सभा-काँग्रेसचा भेंड्यात रास्तारोको
धर्मांतराचे जाळे : नाशिकमधील कुणाल असा झाला आतिफ

कॉ.बाबा आरगडे, संभाजी माळवदे, कॉ.अड.बंशी सातपुते, यांनी भाषणे करून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर कडाडून टीका केली. तीन काळे कृषी कायदे मागे घ्यावेत, शेती मालाला हमी भावाची तरतूद करावी, वीज बिल 2020 मागे घ्यावे, सुधारित कामगार कायदे मागे घ्यावेत, सार्वजनिक उद्योग विक्री-खाजगीकरण रद्द करावे या प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

आंदोलनात कॉ.आप्पासाहेब वाबळे, कॉ.भारत आरगडे, वसंतराव फटांगडे, रामभाऊ पाउलबुद्धे, संजय फुलमाळी, खंडू पाटील, संजय होडगर, शोभा पातारे, मुरलीधर तागड, संदीप मोटे, सौरव कसावणे, बाबासाहेब जावळे, दत्ता गवारे, भास्कर खंडागळे, आदी सहभागी झाले होते. नेवासा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांनी निवेदन स्वीकारले.उपनिरीक्षक समाधान भाटेवाल व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com