अल्पवयीन मुलीला पळविणाऱ्याच्या अटकेसाठी रास्तारोको

नेमकं काय आहे प्रकरण?; कुठे घडली घटना?
अल्पवयीन मुलीला पळविणाऱ्याच्या अटकेसाठी रास्तारोको

श्रीरामपूर | प्रतिनिधी | Shrirampur

अल्पवयीन मुलीचा (Minor girl) शोध घेवून तिला पळवून नेणाऱ्या आरोपीला अटक करावी, या मागणीसाठी बेलापूर (Belapur) येथे आज एक तास रास्ता रोको आंदोलन (Rasta Roko Andolan) करण्यात आले. आंदोलनामुळे दोन्ही बाजूला मोठी वाहतूक ठप्प झाली होती.

बेलापूरातून १४ वर्षाची मुलगी गेल्या वीस दिवसापासून गायब असून या विषयांमध्ये आरोपी आयुब शेख याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासामध्ये एलसीबीला (LCB) सामील करून घेण्यात आलेले आहे. मुलीचा तपास आम्ही लवकरात लवकर लावून आरोपीला कडक शासन करू असे श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे (Shrirampur Police Station) पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी लेखी पत्र दिले व उपविभागीय पोलिस अधिकारी मिटके यांनी सुमारे दीड तास चाललेल्या रास्तारोकोला मागे घेण्याचे आवाहन केले . त्यानंतरच बेलापूर येथे महाराणा सामाजिक प्रतिष्ठान व सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात आलेला रास्ता रोको मागे घेण्यात आला.

गेल्या 20 दिवसा पूर्वी पळून नेलेल्या मुलीचा अद्याप पर्यंत तपास लागलेला नाही याचे निषेधार्थ महाराणा सामाजिक प्रतिष्ठान व सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने बेलापूर गावात रास्ता रोको करण्यात आला. हा रस्ता रोको सुमारे दीड तास उपविभागीय पोलिस अधिकारी श्री मिटके साहेब यांनी हा रास्ता रोको मागे घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर हा रास्ता रोको मागे घेण्यात आला यावेळी प्रांताधिकारी अनिल पवार तहसीलदार प्रशांत, निरीक्षक संजय सानप आदी अधिकारी उपस्थित होते.

या आंदोलनाला विश्व हिंदू परिषदेचे (Vishwa Hindu Parishad) जिल्हाअध्यक्ष डॉक्टर दिलीप शिरसाठ, भाजपचे (BJP) नेते प्रकाश चित्ते, शिवप्रतिष्ठानचे प्रवीण, जय श्रीराम मंडळाचे भरत, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, बेलापूरचे उपसरपंच अभिषेक खंडागळे बेलापूरचे नेते सुनील मुथ्था, भाजपा नेत्या पुष्पाताई हरदास, सौ किरण सोनवणे मार्केट कमिटीचे संचालक सुधीर नवले, महाराणा प्रताप सामाजिक प्रतिष्ठानचे सुहास पवार, राजेंद्र चव्हाण, संदीप पवार, लक्ष्मण साळुंके, नरहरी पवार, रामभाऊ पवार, संतोष चव्हाण, कैलास पवार, नवनाथ पवार, रवी चव्हाण, राजु पडवळ, विजय पवार, केशव गोविंद ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब हरदास आदींसह अनेक मान्यवर नेते उपस्थित होते.

मुलीचा तपास लवकर न लागल्यास या आंदोलनाची व्याप्ती जिल्हाभर वाढवली जाईल असा इशारा डॉक्टर शिरसाठ यांनी दिला. यावेळी बोलताना भाजपा नेते प्रकाश चित्ते म्हणाले, लव जिहादच्या घटनांचा सर्व हिंदू समाजाच्या कुटुंबांमध्ये प्रचार आणि प्रसार करून सर्व हिंदू समाजाला जागृत केले पाहिजे व आपल्या मुलींना लव्ह जिहाद पासुन वाचविले पाहिजे. यापूर्वी भेर्डापूर येथे असा प्रकार घडला होता. पोलिसांनी वेळीच दखल न घेतल्यास श्रीरामपूरातील सामाजिक संतुलन बिघडल्या शिवाय राहणार नाही असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

यावेळी बोलताना सुनील मुथ्था म्हणाले पोलिसांनी मुलीचा तपास लवकर न लावल्यास आम्ही सर्व प्रथम बेलापूर बंद करू त्यानंतर श्रीरामपूर बंद करू नंतर जिल्हा बंद करू असे करून आंदोलनाची व्याप्ती वाढवली जाईल असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com