राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाच्या अध्यक्षपदी होळकर तर विश्वस्त पदी रमेशगिरी महाराज यांची बिनविरोध निवड

राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाच्या अध्यक्षपदी होळकर तर विश्वस्त पदी रमेशगिरी महाराज यांची बिनविरोध निवड

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

कोपरगाव तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाच्या अध्यक्षपदी दत्तात्रय बाळकृष्ण होळकर तर विश्वस्त पदी आश्रमाचे महंत रमेशगिरी महाराज यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नुकतेच आश्रमाचे अध्यक्ष शिवभक्त मोहनराव पिराजी चव्हाण त्यांचे निधन झाले.त्याच्यांनंतर आश्रमाचा रिक्त असलेल्या जागेवर ही निवड करण्यात आली.

यावेळी आश्रमाचे विश्वस्त विलास कोतेसह संत जनार्दन स्वामी महाराज भक्त परिवारातील हजारो भक्त उपस्थित होते. निवडीनंतर अध्यक्ष होळकर व विश्वस्त रमेश गिरी महाराज यांची देवी मंदिर ते समाधि मंदिरा पर्यंत मिरवणूक वाजत-गाजत काढण्यात आली. यावेळी बोलताना रमेश गिरी महाराज यांनी सांगितले की, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांचा भक्त परिवार मोठा आहे. अध्यक्ष विश्वस्त निवड विश्वस्त मंडळाच्या प्रक्रियेत शांतपणे झाली. मंडळात कुठलेही आढे वेढे नसून आता बाबाजींच्या पुण्यतिथी जोरदारपणे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर अध्यक्ष दत्तात्रय होळकर यांनी सांगितले की, विश्वस्त मंडळ व भक्त परिवाराने दाखवलेला विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊन बाबाजींचे काम जगभर नेले जाईल असे त्यांनी सांगितले.

स्वर्गीय शिवभक्त मोहनराव चव्हाण यांनी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाच्या विकासासाठी केलेले काम सर्वश्रुत असून त्यांच्या नंतरही आश्रमाच्या विकासाची धुरा विश्वस्त मंडळ सक्षमपणे पुढे नेईल असा विश्वास भक्त मंडळांनी बोलून दाखवला. अध्यक्ष होळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com