
कर्जत |प्रतिनिधी|Karjat
अहमदनगरसह पाच जिल्ह्यातून तडीपार केलेले असतानाही राशीन येथे वावरणार्या राम जिजाबा साळवे या सराईतास कर्जत पोलिसांनी जेरबंद केले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे व अन्य पोलीस कर्मचार्यांना राशीन पोलीस दुरक्षेत्रात राम साळवे हा हद्दपार असतानाही आपल्या राहत्या घरी आला असल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. त्याच्या घरी छापा टाकून पोलीसांनी त्यास जेरबंद केले.
27 एप्रिल 2021 रोजी राम साळवे याचा हद्दपारीचा अर्ज पारित झाला होता. त्याचा कालावधी पुर्ण न होताच राम साळवे हा राशीन गावात मिळुन आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.आदेशाचा भंग केला असल्याने पोलीस कर्मचारी संपत गेणु शिंदे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 142 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उप विभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, काळे, वाबळे, पोकळे आदींनी केली आहे.