राशीनचा पोलीस हवालदार लाचलुचपतच्या जाळ्यात

गुन्ह्यात मदत करण्यासाठी मागितली होती लाच
राशीनचा पोलीस हवालदार लाचलुचपतच्या जाळ्यात

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

तालुक्यातील राशीन पोलीस ठाण्याच्या (Rashin Police Station) पोलीस हवालदार वीस हजार रुपयांची लाच (Bribe) घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Bribery Prevention Department) अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले.

अण्णासाहेब बाबुराव चव्हाण (52) असे या लाचखोर हवालदाराचे नाव आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Bribery Prevention Department) अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील भांबोरा (Bhabora) येथील तक्रारदार यांच्या विरोधात कर्जत पोलीस स्टेशनमध्ये (Karjat Police Station) अदखलपात्र गुन्हा दाखल झालेला होता. या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी पोलीस हवालदार अण्णासाहेब चव्हाण यांनी तक्रारदार यांना तीस हजार रुपयांची मागणी (Money Demand) केली होती. यानंतर तक्रारदार व श्री चव्हाण यांच्यामध्ये तडजोड होऊन वीस हजार रुपये देण्याचा निर्णय झाला. यानंतर या प्रकरणी तक्रारदार यांनी नगर (Nagar) येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (Bribery Prevention Department) यांच्याकडे यासंदर्भात लेखी तक्रार केली होती.

ठरल्याप्रमाणे मंगळवारी राशीन येथे वीस हजार रुपये घेण्यासाठी अण्णासाहेब चव्हाण यांना राशिन भिगवण रोडवरील खरात हॉस्पिटल समोर बोलवले होते. या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी सापळा रचला होता. हवालदार चव्हाण यांनी तक्रारदाराकडून 20 हजाराची रक्कम स्विकारताच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी त्यांना रंगेहात पकडले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक सुनील कडसाने, अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे पोलिस उपाधीक्षक सतीश भामरे, पर्यवेक्षण अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखालीपोलीस निरीक्षक शरद गोर्ड, पोलीस हवलदार संतोष शिंदे, रमेश चौधरी, विजय गंगुल, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, महिला पोलीस नाईक राधा खेमनार, संध्या मस्के चालक हारुन शेख राहुल डोळस यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com