कर्जत |तालुका प्रतिनिधी|Karjat

कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गुटखा विक्रीवर कारवाई करण्याबाबत कर्जत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आदेशीत केले होते.

कारवाई करून मोठ्या प्रमाणावर गुटखा जप्त केला आहे.

त्या अनुषंगाने कारवाई करण्याबाबत पोलीस अधिकारी आणि जवान माहिती घेत होते. राशीन येथील विजय किराणा दुकानात गुटखा विक्रीसाठी करमाळा येथील इसमाकडून आणून साठा करत असल्याबाबत राशीन पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी स्टाफसह जाऊन छापा टाकला असता सदर ठिकाणाहून विविध ब्रँडचा हिरा, विमल व इतर गुटखा असा एकूण 3 लाख 92 हजार 980 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून राशीन येथील साठा करणारा आणि करमाळा येथील गुटखा पुरवणारा यांच्याविरुद्ध कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपी विजय कानगुडे, रा. राशीन, ता. कर्जत व राजू तांबोळी, रा. करमाळा, जि. सोलापूर यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस स्टाफ तुळशीराम सातपुते,मारुती काळे,भाऊसाहेब काळे, गणेश ठोंबरे, सागर म्हेत्रे, संपत शिंदे, सचिन वारे, होमगार्ड बापु गदादे यांनी केली.