राशीन येथे विवाहितेस मारहाण; दहा जणांवर गुन्हा

राशीन येथे विवाहितेस मारहाण; दहा जणांवर गुन्हा

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

तालुक्यातील राशीन येथील विवाहिता आणि तिच्या कुटुंबियांना भर रस्त्यात जबर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असून याप्रकरणी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये दहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुलोचना अशोक शिंदे, आदित्य अशोक शिंदे, मच्छिंद्र काळे, सविता शिंदे, खामसूल शिंदे, विशाल शिंदे, नमकलाल शिंदे, मंदा शिंदे सर्व (रा.फलटण) व आयमन काळे, मुकावली काळे (दोघे राहणार राशीन) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

याप्रकरणी राशीन येथील तेजस्विनी किशोर काळे यांनी तक्रार दाखल केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, संशयित सर्वजण नातेवाईक तीला फलटण येथे बळजबरीने घेऊन जात असताना तिच्या कुटुंबियांनी विरोध केला. म्हणून गावातील डॉक्टर खरात यांच्या हॉस्पिटल जवळ त्यांच्या आईस मारहाण करण्यात आली. आईला सोडविण्यासाठी त्या गेल्या असता. त्यांनाही जबर मारहाण करण्यात आली. दरम्यान त्यांच्या गळ्यातील 27 ग्रॅम वजनाचे दागिने गहाळ झाले आहेत. या घटनेमध्ये संघटनेचे अध्यक्ष यांनी पदाचा वापर करून आमच्यावर अन्याय केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. काळे यांच्या फिर्यादीवरून दहा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com