
कर्जत |प्रतिनिधी| Karjat
कर्जत तालुक्यातील राशीन येथील साळवे कॉलनीमध्ये प्राथमिक शाळेचे शिक्षकाच्या घरी घरफोडी झाली. चोरट्यांनी दिड लाखाचेा ऐवज लंपास केला असून याबाबत कर्जत पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिक्षक सतीश आनंदराव मुळे यांनी तक्रार दाखल केली आहे.
त्यानुसार मुळे हे त्यांची आई आजारी असल्यामुळे त्यांच्या लातुर जिल्ह्यातील उजनी या मूळ गावीे गेले होते. गावाहून 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता राशीन येथे आले. चाव्या घेवून घर उघडण्यासाठी गेले असता त्यांना दरवाजाचा कोयंडा तुटलेला दिसला. घरातील कपाटाचे दार उघडे व सामानाची उचकापाचक जाल्याचे दिसले.
घरामध्ये चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरीमध्ये सोन्याचे दोन गंठण, कानातील वेल, फुले, सोन्याची अंगठी चांदीचे फुलपात्र, वाटी पंचपाळ असा दिड लाखाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समजले.घटना समजताच पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी
घटनास्थळी भेट दिली. ठसे तज्ञांची टीमही दाखल झाली. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.