रांजणगाव खुर्दमध्ये 40 जणांची करोना रॅपिड टेस्ट

सर्व निगेटिव्ह
रांजणगाव खुर्दमध्ये 40 जणांची करोना रॅपिड टेस्ट

एकरूखे (वार्ताहर) - राहाता तालुक्यातील रांजणगाव खुर्द येथील भाजी मंडईमध्ये ग्रामपंचायत व आरोग्य उपकेंद्र यांचे मार्फत तेथील 40 लोकांचे रॅपिड टेस्ट करण्यात आली.

रांजणगावमध्ये करण्यात आलेल्या या सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. गावात एकही रुग्ण नसताना सदर उपक्रम राबविला गेला. यावेळी रांजणगाव खुर्दचे सरपंच सुनीता सोपान कासार, उपसरपंच निलीमा गाढवे, सदस्य बाबासाहेब गाढवे, चंद्रकांत घोगळ, संतोष गाढवे तसेच आरोग्य विभागाचे डॉ. सातव तसेच आरोग्य कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

गणेशनगर येथे बस स्टँडसमोर भाजी विक्रेते व्यापार्‍यांना अनेक वेळा सांगूनही हे व्यापारी आपली दुकाने थाटून बसतात. यामुळे या स्टँड परिसरात मोठी गर्दी होत असल्याने ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्यावतीने या व्यापार्‍यांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. यापुढे बाहेरील व्यापारी आपल्या भाजीपाल्यासह व्यापार करण्यासाठी आले तर त्यांची टेस्ट व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सरपंच सुनीता कासार यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com