माळेवाडीत रॅपिड चाचणी करून 144 जणांचे लसीकरण

माळेवाडीत रॅपिड चाचणी करून 144 जणांचे लसीकरण

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - तालुक्यातील माळेवाडी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने रॅपिड अँन्टीजन चाचणी करून त्यानंतर सुमारे 144 जणांचे लसीकरण करण्यात आले.

याप्रसंगी सरपंच सोपान औताडे म्हणाले करोना थांबविण्यासाठी लसीकरण करणे हि काळाची गरज असून हिवरेबाजार चा आदर्श ठेवून करोनाला वेशीच्या बाहेरच थांबवायचे असून यासाठी मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्स सह स्वंय:शिस्त पाळण्याचे आवाहन सरपंच औताडे यांनी केले.

यावेळी आरोग्य केंद्राचे डॉ. सुनील राजगुरू, डॉ. श्रीमती रितु लखोटीया, उपसरपंच अनिता वाघ, चेअरमन किशोर जाधव, पोलीस पाटील सौ. उज्वला जाधव, ग्रा. प.सदस्य चद्रशेखर वमने, सुशील वमने, रावसाहेब मोहन, साईनाथ ढोबळे, ग्रा. प. कर्मचारी तसेच ग्रामस्थ अनिल औताडे, पोपट आप्पा वमने, रंगनाथ हाडके, किशोर थोरात, राजेद्र वमने, दिलीप औताडे, बबनतात्या औताडे, राजेंद्र शेळके, प्रकाश ढोबळे व आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान पंचक्रोषी साठी लाभदायक ठरलेले माळेवाडी कोविड सेंटर येथे 55 बाधित रुग्ण कोविड मुक्त होऊन घरी परतले असून 20 जणांवर उपचार सुरु आहेत. कोविड 19 हेल्प माळेवाडी ग्रृपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत होत आहे.

सराला बेटचे महंत रामगिरी यांनी कोविड सेंटरचे सुरु असलेले चांगले कार्य पाहुन बेटात असलेली अ‍ॅम्ब्युलन्स वाहन तात्पुरत्या स्वरूपात वापरण्यासाठी माळेवाडी कोविड सेंटर व ग्रामपंचायतकडे सुपुर्द केले आहे, अशी माहिती सरपंच सोपान औताडे यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com