डाऊच खुर्दला रॅपिड टेस्ट

डाऊच खुर्दला रॅपिड टेस्ट

सोनेवाडी (वार्ताहर) - कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द येथे जिल्हा परिषद शाळेत मोफत करोना रॅपिड टेस्ट करण्यात आली.

व्यावसायिक, किराणा दुकानदार, दूध संकलन केंद्र, भाजीपाला विक्रेते, पिठ गिरणी, मटन विक्रेते इतर दूध वाहतूक करणारे गाडी चालक यांनी तात्काळ टेस्ट करून घ्यावी अन्यथा आपला व्यवसाय करोना काळात बंद ठेवण्यात येईल असे आदेश ग्रामपंचायतीने काढल्यानंतर काल आरोग्य कर्मचार्‍यांच्या मार्फत करोना रॅपिड टेस्ट करण्यात आली.

यावेळी सरपंच संजय गुरसळ यांनी रॅपीड टेस्ट बाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, करोना महाभयंकर आजार असून 14 दिवसांनंतर याची लक्षणे जाणवतात. तोपर्यंत एखाद्या व्यक्तीकडून अनेक व्यक्तींना करोनाची बाधा झालेली असते. त्यामुळे प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन स्थानिकांनी करणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वांनी ही टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com