विनामास्क फिरणार्‍यांची अँटीजेन चाचणी

शहर पोलीस, मनपा पथकाकडून कारवाई
विनामास्क फिरणार्‍यांची अँटीजेन चाचणी

अहमदनगर (प्रतिनिधी) - करोना रूग्णसंख्या कमी होत असली तरी संभाव्य तिसर्‍या लाटेचा धोका आहे. बाजारपेठ सुरू झाली आहे. यामुळे रस्त्यावर नागरिकांची गर्दी वाढत आहे. यामुळे शहर पोलीस व महापालिका यांच्या संयुक्त पथकाकडून नगर शहरात दोन दिवसांपासून फिरणार्‍यांची रस्त्यावरच अँटीजेन चाचणी करण्यात येत आहे. तसेच विनामास्क फिरणार्‍यांवर शहर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. रविवार, सोमवार दोन दिवस शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून शहर पोलिसांनी विनामास्क फिरणार्‍या लोकांवर दंडात्मक कारवाई केली.

करोना रूग्णसंख्या कमी झाल्याने अनलॉक करण्यात आले आहे. यामुळे रस्त्यावर वर्दळ वाढली आहे. बाजारपेठांमध्ये गर्दी वाढू लागली आहे. करोना संख्या कमी झाली असली तरी धोका टळलेला नाही. यामुळे खबरदारी घेणे हाच पर्याय आहे. बाहेर पडताना तोंडावर मास्क असणे आवश्यक आहे. मात्र, अनेकांच्या चेहर्‍यावर मास्क दिसून येत नाही. अशा लोकांपासून करोना संसर्ग होण्याची भिती जास्त असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या आहेत. शहर पोलिसांबरोबर मनपाच्या दक्षता पथकाकडून कारवाई केली जात आहे. अँटीजेन चाचणीत पॉझिटीव्ह आल्यास त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार असल्याचे, प्रशासनाकडून सांगण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com