खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गजाआड

खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गजाआड

अकोले |प्रतिनिधी| Akole

खंडणीच्या (Ransom) गुन्ह्यातील आरोपी मयूर सुभाष कानवडे (वय 32, रा. संगमनेर) यास गुन्हा दाखल (Filed a Crime) झाल्यानंतर दहा महिन्यांनी पोलिसांनी अटक (Police Arrested) केली आहे. त्यास बुधवारी अकोले न्यायालयासमोर (Akole Court) हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी (Police Cell) सुनावण्यात आली.

खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गजाआड
नववर्षाचे स्वागत यंदाही घरीच!

आर्किटेक्ट लक्ष्मीकांत उर्फ चेतन अंबादास नाईकवाडी यांच्याकडून 30 लाख रुपयांची खंडणी (Ransom) उकळल्या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात (Akole Police Station) 2 फेब्रुवारी 2021 रोजी मयूर सुभाष कानवडे याच्यासह दोन जणांवर गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला होता. तेंव्हापासून मयूर कानवडे हा पसार होता. त्यास तब्बल 10 महिन्यांनी 28 डिसेंबर 2021 रोजी रात्री 10.35 च्या सुमारास संगमनेर (Sangamner) येथून ताब्यात घेण्यात आले.

खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गजाआड
चाकूचा धाक दाखवत श्रीरामपूर एमआयडीसी रस्त्यावर शेतकर्‍यास लुटले

मयूर कानवडे याचा संगमनेर (Sangamner) येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने औरंगाबाद हायकोर्टात (Aurangabad High Court) जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र औरंगाबाद हायकोर्टाने 25/06/2021 रोजी त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता.तेव्हापासून अकोले पोलीस (Akole Police) त्याच्या शोधात होते. अखेर अकोले पोलिसांनी त्यास सापळा रचून संगमनेर येथून ताब्यात घेतले. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भूषण हांडोरे हे करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com