रांजणखोल सोसायटीच्या अध्यक्षपदी जया ढोकचौळे तर उपाध्यक्षपदी सुशिला दोंड

रांजणखोल सोसायटीच्या अध्यक्षपदी जया ढोकचौळे तर उपाध्यक्षपदी सुशिला दोंड

रांजणखोल |वार्ताहर| Rajankhol

राहाता तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या रांजणखोल विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी जया अरुण ढोकचौळे तर उपाध्यक्षपदी सुशिलाबाई शिवाजी दोंड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

राहाता येथील सहकारी सेवा संस्थेचे सहाय्यक निबंधक आर. के. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. अध्यक्षपदाची सूचना गिताराम ढोकचौळे यांनी मांडली तर अनुमोदन संचालक अमर ढोकचौळे यांनी दिले. उपाध्यक्षपदाची सूचना लक्ष्मण बोर्‍हाडे यांनी मांडली त्यास मच्छिंद्र ढोकचौळे यांनी अनुमोदन दिले.

याप्रसंगी कारेगाव भाग शुगर कंपनीचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील ढोकचौळे, मुळा-प्रवरा सोसायटीचे ज्येेष्ठ संचालक अंबादास पाटील ढोकचौळे, सोसायटीचे संचालक लक्ष्मण ढोकचौळे, विलास ढोकचौळे, संजय ढोकचौळे, बाळासाहेब ढोकचौळे, जगन्नाथ ढोकचौळे, गोविंद अभंग, मंदाकिनी ढोकचौळे, रामदास राशिनकर, अशोक ढोकचौळे, रामदास ढोकचौळे, साहेबराव ढोकचौळे, पोपटराव ढोकचौळे, शिवाजी अभंग, शिवाजी दोंड, नितीन लांडगे, रामदास शिंदे, सरपंच चांगदेव ढोकचौळे, उपसरपंच निलेश जाधव, पोलीस पाटील कृष्णा अभंग, आबासाहेब ढोकचौळे, सचिव विनायक लबडे, मयुर दोंड आदी उपस्थित होते. शेवटी आर. आर. ढोकचौळे यांनी आभार मानले.

रांजणखोल सोसायटीची निवडणूक तसेच पदाधिकारी यांची निवड बिनविरोध पार पाडण्यासाठी सोसायटीच्या सभासदांनी सहकार्य केले. नूतन पदाधिकर्‍यांचे माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील व अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी अभिनंदन केले आहे.

Related Stories

No stories found.