रांजणखोल ग्रामपंचायतीच्या आजी-माजी 22 पदाधिकार्‍यांविरुध्द अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

रांजणखोल ग्रामपंचायतीच्या आजी-माजी 
22 पदाधिकार्‍यांविरुध्द अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

राहाता तालुक्यातील रांजणखोल येथील दिव्यांग मागासवर्गीय व्यक्तीची गायरान जमीन ग्रामंचायतीच्या वापरासाठी घेतली. सदरच्या विहिरीची नोंद रेकार्ड ऑफ राईटला झालेली नाही. संमतीपत्रावर खोटी तारीख टाकून ठराव करून अपंग मागासवर्गीयांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामपंचायत रांजणखोल कार्यालयात जाऊन त्यांना जाब विचारल्यावर आरोपीने फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ करून गावाबाहेर हाकलून देण्याची धमकी दिल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशावरून तब्बल 22 जणांविरोधात नुकताच श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात विठ्ठल बहिणाजी विद्यावे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी सुनीता भगिरथ म्हसे (वय 40), अंबादास भाऊ ढोकचौळे (वय 70), वैजयंती कांता तुंगार (वय 68), निलेश विजय जाधव (वय 48), दीपक बाळू दळवी (वय 47), नितीन किसन लांडगे (वय 46), गंगाधर जगन्नाथ ढोकचौळे (वय 58), सुभाष तुकाराम गायकवाड (वय 55), शांताराम लक्ष्मण अभंग (वय 55), प्रकाश वसंत शिरसाठ (वय 52), मिरा लक्ष्मण जगताप (वय 48), आशा लक्ष्मण वैराळ (वय 50), विजय लक्ष्मण धाकतोडे (वय 54), मनीषा बळीराम अभंग (वय 40), संगीता राजू गायकवाड (वय 42), मंगल गिताराम ढोकचौळे (वय 55), बाबासाहेब सुकदेव ढोकचौळे (वय 54), नलिनी भाऊसाहेब ढोकचौळे (वय 42), परविन जाकीर शेख (वय 44), सलीम बालम पठाण, (वय 45), कारभारी बाबुराव गाडेकर (वय 57), अलका मोहन शेवाळे (वय 52) सर्व रा. रांजणखोल पो. टिळकनगर ता. राहाता जि. अहमदनगर यांचेविरुध्द भादंवि कलम 465,467,471,420 व 34 अन्वये तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 कलम 3(1)2,4,5,10,15 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com