रांजणगावात विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू

रांजणगावात विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू

एकरुखे |वार्ताहर| Ekrukhe

रांजणगाव खुर्द (Ranjangav Khurd ) येथील जीवन प्राधिकरण योजनेसाठी (Jivan Pradhikaran Scheme) नवीन डिपी व पोल टाकून तारा ओढण्याचे काम सुरू होते. यात ठेकेदाराने लाईट बंद करण्याची परवानगी एक ठिकाणची घेतली व काम मात्र दुसर्‍या डिपीवर सुरू केल्याने नवनाथ मारुती सुपेकर या कर्मचार्‍याचा विजेचा धक्का (Electric Shock) लागून मृत्यू (Death) झाला.

राहाता तालुक्यातील (Rahata) रांजणगाव खुर्द (Rajangav Khurd) येथील ग्रामपंचायतीच्या डीपीचे काम सुरू असताना लाईट बंद करण्याची परवानगी एकरुखे सबस्टेशनची होती. त्याचा विद्युत पुरवठाही खंडीत करण्यात आला. मात्र ठेकेदाराने कामगारांना गावठाण डिपीवर काम करण्यास सांगितले. या डिपीचा विद्युत पुरवठा ( Power Supply) सुरू होता. ही गोष्ट कामगारांना माहीत नव्हती. ठेकेदाराच्या सांगण्यानुसार कामगार गावठाणच्या डिपीवर चढल्यानंतर विद्युतपुरवठा सुरू असल्याचे लक्षात आले. नवनाथ मारुती सुपेकर (वय 30) हे या या डिपीवर चढले. त्यांचा तारांना स्पर्श होताच त्यांचा शॉक (Electric Shock) लागून मृत्यू (Death) झाला. ही घटना काल सोमवारी दुपारी घडली.

त्याला राहाता ग्रामीण रुग्णालयामध्ये पोस्टमार्टम करून मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आला. राहाता पोलीस स्टेशनला (Rahata Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. याप्रकणी पुढील तपास राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉ. कदम व बाबा सांगळे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com