रांजणगावदेवी येथे मागील भांडणाच्या कारणारुन दोन गटात हाणामारी

परस्परविरोधी फिर्यादीवरुन 9 जणांवर गुन्हा दाखल
रांजणगावदेवी येथे मागील भांडणाच्या कारणारुन दोन गटात हाणामारी

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील रांजणगावदेवी येथे मागील भांडणाच्या कारणावरून हाणामारीची घटना घडली असून दोन्ही बाजूच्या परस्परविरोधी फिर्यादीवरून 9 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत ज्योती फुलचंद राऊत (वय 32) धंदा-मजुरी रा. रांजणगावदेवी ता. नेवासा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अजिंक्य सचिन चौधरी, मनीषा सचिन चौधरी, सचिन अशोक चौधरी, अशोक मालकू चौधरी व ताराबाई अशोक चौधरी सर्व रा. रांजणगावदेवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटले की 20 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी व तिचा पती त्यांच्या राहत्या घरासमोर बसलेले असताना वरील पाच आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून मागील भांडणाच्या कारणावरून एकत्र येऊन अजिंक्य सचिन चौधरी याने लाकडी काठीने फिर्यादीच्या पतीच्या उजव्या हाताच्या करंगळीवर मारहाण केली मनीषा सचिन चौधरी व ताराबाई अशोक चौधरी यांनी फिर्यादी मजुरीचे कामाला कशी जाते हे आम्ही पाहून घेऊ, अशी धमकी देऊन त्यांनी फिर्यादीस धरून डोक्याचे केस पकडून खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. झटापटीत फिर्यादीच्या गळ्यातील मनीमंगळसूत्र तुटले. सचिन अशोक चौधरी याने फिर्यादीच्या कानाखाली चापटीने मारले. अजिंक्य सचिन चौधरी याने फिर्यादीच्या स्कुटी गाडीचे लाकडी काठीने खोपडी तोडून नुकसान केले.

या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी वरील पाच आरोपींवर गुन्हा रजिस्टर नं. 724/2022 भारतीय दंड विधान कलम 324, 323, 504, 506, 143, 147, 427 प्रमाणेगुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक श्री. गडाख करत आहेत.

दुसरी फिर्याद सचिन अशोक चौधरी धंदा-शेती रा. रांजणगावदेवी यांनी दिली असून त्यावरून फुलचंद विठ्ठल राऊत, ज्योती फुलचंद राऊत, रितेश फुलचंद राऊत व विजय प्रकाश राऊत सर्व रा. रांजणगावदेवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटले की, 20 ऑगस्ट रोजी सकाळी 7 च्या सुमारास फिर्यादीचा मुलगा हा त्याच्या आजोबा आजीकडे जात असताना फुलचंद विठ्ठल राऊत याने त्याला खुर्ची फेकून मारून त्याच्याकडील मोटारसायकलची (एमएच 17एवाय3045) खोपडी तोडून नुकसान केले. फिर्यादीच्या उजव्या खांद्यावर लाकडी काठीने मारहाण केली तसेच ज्योती फुलचंद राऊत हिने लाकडी काठीने डोक्यात मारहाण केली. आणि फिर्यादी पत्नी मनीषा हिस तिचे कपाळावर लाकडी काठीने मारहाण केली.

तसेच फुलचंद विठ्ठल राऊत याने हातात दगड धरून फिर्यादीचा मुलगा अजिंक्य याचे उजव्या मांडीवर मारला तसेच रितेश फुलचंद राऊत याने लाकडी काठीने माझ्या पाठीवर मारहाण केली. विजय प्रकाश राऊत याने फिर्यादीचा मुलगा अजिंक्य याला लाथाबुकक्यांनी मारहाण केली तसेच सर्व आरोपींनी फिर्यादी, फिर्ळादीचा मुलगा, फिर्यादीची आई व फिर्यादीची पत्नी यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. 725/2022 भारतीय दंड विधान कलम 324, 323, 504, 506, 34, 427 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक एन. एम. भताने करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com