
रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Ranjangav Deshmukh
कोपरगाव (Kopargav) तालुक्यातील धोडेंवाडी येथील शेतकरी पुंजाहारी नेहे यांच्या शेतातील विहिरीत (Well) रात्रीच्या वेळेस बिबट्या (Leopard) पडला. बुधवारी दुपारी नेहे हे विहिरीवर गेले असता त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यावेळी बिबट्या (Leopard) विहीरीतील पाईपला दोन्ही पायांनी कवटाळून होता. नेहे यांनी माणुसकीचे दर्शन दाखवत तात्काळ परिसरातील शेतकर्यांना (Farmer) बोलावले.
याबाबतची माहिती त्यांनी वनविभागाला (Forest Department) दिली. मात्र वन विभाग वेळेत दाखल होऊ शकणार नाही. हे लक्षात येताच सर्व शेतकर्यांनी मिळून एक बाज विहिरीत सोडली. त्यानंतर हा बिबट्या (Leopard) बाजेवर विसावला आणि सर्व शेतकर्यांचा जीव भांड्यात पडला. तोपर्यंत वनविभागाचा (Forest Department) कोणताही कर्मचारी विहिरीवर हजर झाला नव्हता.
दुपारी बारा वाजेच्या सुमारात वनविभागाला (Forest Department) कळविल्यावर तब्बल सहा तासांनी वनपाल एस. बी. गाडे एक कर्मचार्यासह दाखल झाले. कोपरगावात (Kopargav) पिंजरा शिल्लक नसल्याने श्रीरामपुरातून (Shrirampur) पिंजरा बोलविल्याचे वनविभागाने सांगितले श्रीरापुरातील पिंजर्याशी वनविभागाचा संपर्क सुरू होता. मात्र उशिरापर्यंत पिंजरा पोहचलाच नाही.
उपस्थितांपैकी काहींनी खासगी पिंजर्यांचा पर्याय सुचविला. तो पिंजरा रात्री आठ वाजता शेतकर्यांच्या मदतीने विहिरीत (Well) सोडण्यात आला. बिबट्या प्रचंड थकलेला असल्याने पिंजर्यात येण्यास जास्तीचा वेळ लागला. रात्री नऊच्या सुमारास बिबट्या (Leopard) विहिरीतून बाहेर काढला.
दुष्काळी पट्ट्यात अचानक बिबट्यांच्या संख्येत वाढ
पोहेगाव पंचक्रोषीतील दष्काळी पट्ट्यात बिबट्यांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. पाटाच्या वरील भागात मका लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बिबट्याला मकाचा असरा निर्माण झाल्याने बिबट्यांच्या संख्येत लक्षणिय वाढ झाली आहे. दररोज कोणत्या तरी गावात बिबट्याचे दर्शन झाल्याच्या बातम्या ऐकायला येत आहे. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.