रामवाडीत दोन गटांत हाणामारी

तोफखाना पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी
रामवाडीत दोन गटांत हाणामारी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रामवाडी परिसरात दोन कुटुंबात किरकोळ कारणातून वाद झाले. या वादातून मारहाणीची घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मंगळवारी दुपारी ही घटना घडली आहे.

राहुल अशोक साबळे (वय 25 रा. रामवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय साबळे, अमोल साबळे, अमित साबळे, अवि साबळे (सर्व रा. रामवाडी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय याने फिर्यादी राहुल यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. पैसे न दिल्याने फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच त्यांचा भाऊ ऋतिक साबळे याला देखील मारहाण केली आहे.

दुसर्‍या गटाचे अमोल जिजाराम साबळे (वय 23 रा. रामवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल अशोक साबळे (रा. रामवाडी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुलने अविनाशवर ब्लेडने हल्ला करून जखमी केले. तसेच फिर्यादी अमोल यांना तो म्हणाला,‘तुझा मोठा भाऊ आकाश याने माझे वडिलांविरूध्द दिलेली केस मागे घ्यायला लाव, असे म्हणून शिवीगाळ केली. केस मागे घेतली नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com