रामवाडीला झोपडपट्टी घोषित करा

प्रलंबित प्रश्न सुटण्यासाठी काळे फुगे सोडून अनोखे आंदोलन
रामवाडीला झोपडपट्टी घोषित करा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रामवाडीतील (Ramwdi) प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि रामवाडी (Ramwadi) झोपडपट्टी (Slum) घोषित जाहीर होण्यासाठी रामवाडीतील (Ramwadi) झोपडपट्टी वासियांनी समस्यांचे फलक हाती धरून काळे फुगे (Black Balloon) सोडून अभिनव आंदोलन (Movement) केले.

रामवाडीला झोपडपट्टी घोषित करा
उड्डाणपुलाच्या खांबांवर शिवरायांचा जीवनपट

रामवाडीतील (Ramwadi) स्ट्रीट लाईट (Street Light) कधी सुरू होणार, कचर्‍याची समस्या (Garbage Problem), पिण्याच्या पाण्याची समस्या कधी सुटणार, याकडे मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रविवारी सकाळी रामवाडीत साचलेल्या कचर्‍याच्या ढिगार्‍यासमोर हे आंदोलन करण्यात आले. 70 वर्षांपासून नगर शहरात (Nagar City) असलेली झोपडपट्टी म्हणजे रामवाडी. शहरात एकूण 22 झोपडपट्टया आहेत व त्यातून 60 हजार नागरिक झोपडपट्ट्यातून राहतात 22 पैकी 17 झोपडपट्ट्या या घोषित असून 4 झोपडपट्ट्यांचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे.

शहराचे तत्कालीन महापौर संदीप कोतकर (Sandip Kotkar) यांनी कौलारु, कोठला, आहेरवाली, आणि रामवाडी या 4 झोपडपट्ट्यांचा प्रस्ताव शासन दरबारी पाठवला होता. त्यावर सूचक म्हणून तत्कालीन नगरसेवक भाऊसाहेब उडाणशिवे, सादिक शेख आणि वर्षा आरिफ आदींच्या अनुमोदनाने हा प्रस्ताव मंत्रालयात पाठवला. पण त्यानंतर या प्रस्तावाकडे शासनात कडून सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात आले.

रामवाडी झोपडपट्टी घोषित नसल्याने दिवसेंदिवस तेथील समस्या वाढत आहेत. पिण्यासाठी पाणी गढूळ येते, वेळच्यावेळी कचर्‍याचे संकलन होत नाही, अस्वच्छते मुळे गटारी दुर्गंधीपूर्ण झाल्या आहेत. स्ट्रीटलाईट नसल्याने अंधाराचे साम्राज्य असते.या सर्व समस्यांचे निराकरण होण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

विकास उडाणशिवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात तकावत खान,रशीद शेख विकास गाडगे, गौस कुरेशी, इक्राम प्लास्टिकवाला व रामवाडी परीसरातील महिलाही सहभागी झाल्या होत्या. प्रशासनाला जाग आणण्यासाठी यावेळी घोषणा देऊन काळे फुगे सोडण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com