
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
तालुक्यातील रामपूरवाडी येथील एका विवाहीत महिलेच्या अंगाला स्पर्श करत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने एकावर राहाता पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
रामपूरवाडी येथे 13 मे रोजी विवाहित महिला आपल्या लहान मुलासह घरात झोपली असताना पहाटे 3.30 वाजता आरोपी प्रवीण किशोर पंडित उर्फ भैया (वय 25), रा. रामपूरवाडी हा फिर्यादी महिलेच्या घरात घुसून तिला स्पर्श करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले व फिर्यादी महिलेस म्हणाला, तु मला आवडतेस. तु आता इथे अंथरुणावर झोप, मला तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहे. असे म्हणाला व फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
म्हणून फिर्यादीने आरोपीस तिच्या उजव्या हाताच्या कोपर्याचा धक्का देऊन बाहेर पळून जाऊन आरडा ओरडा केल्याने फिर्यादीचे सासू, सासरे, जाव व भाया असे तेथे आल्यामुळे त्यांना पाहून आरोपी पळून गेला. या फिर्यादीवरून आरोपी प्रवीण पंडित याच्यावर राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. 260/2023 भादंवि कलम 354 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बर्डे पुढील तपास करत आहेत.