रामपूरवाडीला शेतकरी चर्चासत्र

रामपूरवाडीला शेतकरी चर्चासत्र

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

तालुका कृषी अधिकारी व रेलिगेअर अ‍ॅग्रो लाइफ बायो यांच्या संयुक्त विद्यमाने रामपूरवाडी येथे शेतीशाळा अंतर्गत शेतकरी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, रेलिगेअर ग्रोचे राजेंद्र गाडेकर उपस्थित होते.

सुधाकर बोराळे यांनी शेतकर्‍यांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड, बीजप्रक्रिया, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, रुंद वरंबा सरी पद्धतीने सोयाबीन पेरणी व खरीप हंगामातील कृषी विभागाच्या धोरणांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी प्रधानमंत्री खाद्य उन्नयन योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. श्री. गाडेकर यांनी बीजप्रक्रिया विषयी माहिती दिली. कृषी सहाय्यक किरण धुमाळ यांनी रामपूरवाडी येथे राबवलेल्या विशेष योजनांची माहिती दिली. कृषी सहाय्यक राजेश पर्‍हे यांनी महाडीबीटी वरील कृषी योजनांची माहिती दिली.

प्रगतशील शेतकरी वाल्मीक जगताप व जगदीश वडणे यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात आलेल्या बीबीएफ तंत्रज्ञानाचे मिळालेले फायदे याबाबत अनुभव कथन केले. शेतकर्‍यांना बीजप्रक्रियाचे प्रत्यक्षिक करून दाखविण्यात आले. एकात्मिक पद्धतीने हुमणी किड नियंत्रण प्रात्यक्षिक करण्यात आले.

यावेळी उपसरपंच मंदाताई काळे, चंद्रभान भोरकडे, बबनराव काळे, सुभाष सांभारे, शिवाजी जगताप, रमेश आंबडकर, शिवाजी आंबडकर, बाळासाहेब रणछोड, आत्माचे किशोर कडू, कृषी सहाय्यक योगेश डाके व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार कृषि सहाय्यक किरण धुमाळ यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com