
तिसगाव |प्रतिनिधी| Tisgav
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील ईदगाह मैदानावर परिसरातील मुस्लिम समाज बांधवांनी रमजान ईद सणाच्या निमित्ताने सामूहिक नमाज पठण केले. यावेळी मुस्लिम समाजातील ज्या तरुणांनी विविध क्षेत्रात गुणात्मक कार्य केले आहे अशा तरुणांचा मुस्लिम समाज बांधव कमिटीच्या वतीने यावेळी येथोचित गौरव करण्यात आला.
येथील ईदगाह मैदानावर मौलाना शहाबुद्दिन, मौलाना जाकिरहुसेन, मौलाना ताजउद्दीन तसेच मुस्लिम समाज कमिटीचे मंन्सुरभाई पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सामूहिक नमाज पठण करून ईदचा सण साजरा करण्यात आला. मुस्लिम समाजातील अनेक तरुण सैन्यदलात कार्यरत असून डॉक्टर, इंजिनियर, सीए, पीएचडी सारख्या अनेक पदव्या मिळवलेल्या तरुणांची इतर तरुणांनी प्रेरणा घ्यावी या हेतूने ईद निमित्ताने सर्व मुस्लीम समाज बांधवांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान केला जात असल्याचे मन्सूरभाई पठाण यांनी सांगितले.
सामूहिक नमाज पठणानंतर हिंदू समाज बांधव देखील मुस्लिम समाज बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी यावेळी उपस्थित होते. एक दुसर्याला ईदच्या निमित्ताने शीरखुर्मा व गुलगुले खाण्यासाठी आवर्जून आमंत्रित करण्यात येत होते. करंजी,मिरी,चिचोंडी, घाटशिरस, निवडुंगे,मढी, जवखेडे, भोसे, लोहसर, खांडगाव या ठिकाणी देखील मुस्लिम समाज बांधवांकडून ईदचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.