रमजान ईद निमित्त भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या मुस्लीम बांधवांना शुभेच्छा

रमजान ईद निमित्त भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या मुस्लीम बांधवांना शुभेच्छा

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

रमजान उपवासातून मनाच्या एकाग्रतेबरोबरच प्रार्थनेला विशेष महत्त्व आहे. मुस्लीम बांधवांसाठी हा पवित्र महिना असून गेल्या महिनाभरात त्यांच्यासह अबाल वृध्दांनी केलेले उपवास निश्चितच सर्व समाजाच्या भल्यासाठी प्रेरणा देणारे ठरतील,असे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले.

कोपरगाव शहर व तालुका भाजपा तसेच संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने रमजान ईद निमित्त भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी मुस्लीम बांधवांची व्यक्तीगत भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी मौलाना शेख, हाजी सद्दामभाई सय्यद, रियाज शेख, लकीरभाई सच्यद, रहिमभाई शेख अहमदभाई बेकरीवाले, मन्सुरभाई शेख, अकबरलाला शेख, निसार शेख, अन्सार शेख, अकिब शेख, नदिम मन्सुरी, अ‍ॅड दारूवाला, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, रिपाइं आठवले गटाचे तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशुर, राहुल सूर्यवंशी, विवेक सोनवणे, बबलु वाणी, वैभव गिरमे गोपि गायकवाड, संदीप देवकर फकिरमहंमद पहिलवान, खालीकभाई कुरेशी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी उपनगराध्यक्ष अरिफ कुरेशी यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.