प्रा. शिंदेंनी आता रडीचा डाव खेळू नये - आ. रोहित पवार

कचरे यांच्या खुलाशाने प्रकरणाला कलाटणी
प्रा. शिंदेंनी आता रडीचा डाव खेळू नये - आ. रोहित पवार

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

भाजपच्या उमेदवारांनी घरगुती अडचणींमुळे माघार घेतली आहे. तसा खुलासा त्यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर केला आहे. या दोन घटनेनंतर राम शिंदे यांनी त्यांच्या पक्षाची व स्वतःची जनतेसमोर होणारी अडचण पाहून केवळ मला बदनाम करण्यासाठी मी दडपशाही करत असल्याचा खोटा आरोप केला आहे. राम शिंदे यांनी आता रडीचा डाव खेळू नये, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.

कर्जत नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपच्या दोन नगरसेविकांनी अचानक माघार घेतल्यामुळे या निवडणुकीला नाट्यमय कलाटणी मिळाली. यानंतर माजी मंत्री राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर दडपशाहीचा आरोप करत आंदोलन केले.

या सर्व घटनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आ.पवार म्हणाले, मी लोकशाही मानणारा कार्यकर्ता आहे, राम शिंदे यांची मानसिक स्थिती मी समजून घेऊ शकतो, वास्तविक पाहता ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे. भाजपच्या उमेदवारी अर्ज भरलेल्या अनेक उमेदवारांच्या लक्षात ही बाब आल्यामुळेच त्यांनी निवडणुकीमधून माघार घेतली आहे हे आता स्पष्ट झाले आहे.

मी कोणाच्याही दबावामुळे किंवा कोणी सांगितले म्हणून माघार घेतली नसून माझ्या घरगुती अडचणीमुळे हा निर्णय मी घेतला आहे. आमदार रोहित पवार यांचा किंवा कोणत्याही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आम्हाला फोन किंवा संपर्क नाही आम्ही स्वतःहून आमच्या घरगुती अडचणीमुळे माघार घेतली आहे.

- नीता कचरे, नगरसेविका प्रभाग 2

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com