७ दिवस, ७ हजार किलो रांगोळी अन् ४० कलाकार; डोळ्याचे पारणे फेडणारी साईबाबांची विश्वविक्रमी रांगोळी पुर्ण, पाहा फोटो

७ दिवस, ७ हजार किलो रांगोळी अन् ४० कलाकार; डोळ्याचे पारणे फेडणारी साईबाबांची विश्वविक्रमी रांगोळी पुर्ण, पाहा फोटो

शिर्डी | शहर प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र शिर्डी येथील श्री साईबाबा रामनवमी उत्सवातील प्रमुख आकर्षण असलेल्या शिर्डी शहरातील साईनगर मैदानावरील श्री साईबाबांच्या भव्य दिव्य साकारलेल्या ४० हजार स्के.फु.विश्वविक्रमी रांगोळी रविवारी पहाटेपर्यतपूर्ण झाली असून याचे उद्घाटन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था तसेच शिर्डी ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्था व शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या ऐतिहासिक श्री रामनवमी उत्सवास भक्तीमय वातावरण सुरुवात झाली आहे. आज श्री रामनवमी उत्सवाचा मुख्य दिवस असून या उत्सवादरम्यान श्री रामनवमी यात्रा कमिटीचे अध्यक्ष कमलाकर कोते यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

यामध्ये आकर्षण असणाऱ्या श्री साईबाबांच्या ४० हजार स्के फुटाच्या भव्य रांगोळीचे उद्घाटन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत यांच्या शुभहस्ते पार पडले.

यावेळी पुरोहीतांच्या हस्ते श्री साईबाबांच्या रांगोळी मैदानावर विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी रांगोळी कलाकारांना फेटे बांधून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत भव्य स्वागत करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कलाकारांच्या गळ्यात रेड कारपेटवर फुलहार घालण्यात आले.तसेच कलाकारांना सर्टिफिकेट देण्यात आले. सदरची रांगोळी भाविकांना पहाण्यासाठी खुली करून देण्यात आली आहे.

याप्रसंगी नाशिक आयकर विभागीय आयुक्त संजय धिवर, कैलासबापू कोते, विश्वस्त डॉ एकनाथ गोंदकर, महेंद्र शेळके, अँड सुहास आहेर, सचिन गुजर, जयवंत जाधव, अविनाश दंडवते, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, यात्रा कमिटीचे अध्यक्ष कमलाकर कोते, अभय शेळके, बाबासाहेब कोते, नितीन कोते, निलेश कोते, जगन्नाथ गोंदकर, रवींद्र गोंदकर, ताराचंद कोते, सचिन तांबे, मंगेश त्रिभुवन, ज्ञानेश्वर गोंदकर, मधुकर कोते, अरविंद कोते, दत्तात्रय कोते, आप्पासाहेब कोते, दिलीप रोहोम, अशोक गोंदकर, रमेश गोंदकर, राहुल गोंदकर, रांगोळी कमिटीचे अध्यक्ष मुकुंद गोंदकर, मनिलाल पटेल, प्रकाश गोंदकर, प्रतिक शेळके, नितीन अशोक कोते, किरण कोते, दिलीप काळे, विकास गोंदकर, विरेश चौधरी, विशाल भडांगे, गणेश कोते, सलिम शेख, अभिजित कोते, सुनील बारहाते आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.