राळेगण थेरपाळ येथे घरफोडी

राळेगण थेरपाळ येथे घरफोडी

घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम यांची चोरी

सुपा |वार्ताहर| Supa

पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथील सालके वस्तीवर 30 एप्रिल रोजी रात्री साडेबाराच्या दरम्यान चोरट्यांनी घरफोडी करत कपाटात ठेवले सात तोळे सोन्याचे दागिने रोख चार हजार असा अंदाजे 4 लाखाचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथील अशोक सिताराम सालके यांच्या घरातून रात्री साडेबाराच्या सुमारास घरातील सर्व झोपेत असताना आतून लावलेली कडी कोंडा खोलून चोरांनी घरामध्ये प्रवेश केला कपाटातील साहित्याची उचकापाचक करत कपाटात ठेवलेले सात ते आठ तोळे सोन्याचे दागिने तसेच चांदी व रोख रक्कम आदी चोरी करत चोर पसार झाले.

एकच्या सुमारास लहान मुलगी उठल्यानंतर सालके हे उठले असता त्यांना घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले त्यानंतर त्यांनी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने पाहिले मात्र ते त्यांना दिसून आले नाही त्यामुळे दागिन्यांची चोरी झाल्याचे सालके यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आसपासच्या शेजार्‍यांना याबाबत कळवले. मात्र चोरांचा थांगपत्ता लागला नाही पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत. डॉग स्कॉड व फिंगर प्रिंट यांना पाचारण करण्यात आले आहे.

चोरांची चप्पल घटनास्थळी आढळून आले आहे तसेच चोरी करण्यापूर्वी चोरांनी बाहेर असणाऱ्या दुचाकीचे प्लग काढून ठेवले होते तसेच अंधार व्हावा म्हणुन बाहेरील बल्प काढण्यात आले होते. दरम्यान श्वानपथक आल्यानंतर अर्धा किलोमीटर पर्यंत शोध घेत पथक तिथे अडखळे त्यानंतर ठशा तज्ञांनी पाहणी केली. यावेळी पोलीस निरीक्षक घनश्याम बळप उपनिरीक्षक विनयकुमार बोत्रे कॉन्स्टेबल निकम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com